News Flash

दिवसभरात ३५ पोलीस बाधित

दलातील बाधितांची संख्या ८६५५वर

संग्रहीत

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव पोलीस दलावरही दिसू लागला आहे. गेल्या २४ तासांत मुंबई पोलीस दलातील ३५ अधिकारी, अंमलदार बाधित झाले.

गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून आतापर्यंत मुंबई पोलीस दलातील ८ हजार ६५५ अधिकारी, अंमलदार बाधित झाले आहेत. त्यापैकी १०२ जणांचा मृत्यू झाला. बाधित झालेल्यांपैकी ७ हजार ९५१ पोलिसांनी करोनावर मात के ली असून ७ हजार ५५१ पोलीस कर्तव्यावर परतले. सध्या ६०२ पोलीस बाधित आहेत.

दिवसभरात पोलिसांनी नियमभंगाबाबत ४५६ गुन्हे नोंदवले. त्यात २४३ जणांना अटक करून जामिनावर मुक्त करण्यात आले. सहा जणांचा शोध सुरू असून २०७ जणांना नोटीस जारी करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी १२६ वाहने जप्त केली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2021 12:54 am

Web Title: 35 policemen positive during the day abn 97
Next Stories
1 एनआयए पथक मनसुख हिरेन यांच्या निवासस्थानी
2 करोना रुग्णांच्या मदतीसाठी सेवाभावी संस्थांची ‘हेल्पलाईन’
3 भाजप खासदाराच्या बनावट जातप्रमाणपत्रप्रकरणी एकास जामीन