लोकसत्ता , प्रतिनिधी
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात करोनाबाधितांची संख्या १७ हजाराजवळ येऊन पोहोचली  आहे.शहरात आज ३६१ नवे करोनाबधित आढळले असून    करोनाबाधितांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होत आहे. शहरात मृतांची संख्याही दररोज वाढत आहेत. वाढत्या संसर्गामुळे शहरात करोनाबाधितांची  एकूण संख्या १७,३१८ झाली आहे. शहरात आज  ५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून करोनामुळे मृत पावलेल्यांची एकूण संख्या ४४६ झाली आहे.

शहरात आतापर्यत तब्बल १२,९०३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर शहरात ३,९६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात आतापर्यंत २७,६७६ प्रतिजन चाचण्या करण्यात आल्या आहेत.शहरात करोना चाचण्यांची संख्या एका दिवसाला अडीच हजारपेक्षा अधिक चाचण्या होत आहेत.पालिका आयुक्त  अभिजीत बांगर यांनी नेरुळ येथे पालिकेची स्वतंत्र करोना चाचणी प्रयोगशाळा तयार केली असून दुसरीकडे शहरात सुरु करण्यात आलेले मॉल ३१ ऑगस्ट पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.