मुंबई : सर्वच महिलांना लोकल प्रवासाची परवानगी दिल्यानंतर महिला विशेष लोकल फे ऱ्यांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने पश्चिम रेल्वेने नियोजन सुरू के ले आहे. सध्या सहा लोकल धावत आहेत. त्यात आणखी चार महिला विशेष लोकल फे ऱ्यांची भर पडेल.
टाळेबंदीत अत्यावश्यक सेवेत असलेल्या महिला प्रवाशांकरिता काही महिन्यांपूर्वी दोन लोकल पश्चिम रेल्वेने सुरू के ल्या. त्यानंतर सर्वच महिलांना लोकल प्रवासाची परवानगी मिळाल्याने २१ ऑक्टोबरपासून आणखी चार लोकलची भर पडली. या लोकल चर्चगेट ते विरार ते चर्चगेट दरम्यान धावत आहेत. अत्यावश्यक सेवा कर्मचारी महिला सोडता अन्य महिलांना लोकल प्रवासाची परवानगी सकाळी ११ ते दुपारी ३ आणि सायंकाळी ७ नंतर आहे. या वेळेतही प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीय आहे. २० ऑक्टोबरला ३ लाख ५३ हजार ५५७ असलेली प्रवासी संख्या २५ ऑक्टोबरला ३ लाख ८० हजार झाली. यात महिला प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. टाळेबंदीआधी महिलांसाठी दहा लोकल फे ऱ्या होत्या. आता ही संख्या सहा आहे. आणखी चार महिला विशेष लोकल फे ऱ्या सुरू करण्याचे नियोजन पश्चिम रेल्वेकडून आखले जात आहे. चर्चगेट ते विरार ते चर्चगेटबरोबरच डहाणूचाही विचार होत आहे. गर्दीच्या वेळेबरोबर कमी गर्दीच्या वेळेतही या फे ऱ्या चालवण्यात येतील. यासंदर्भात पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकू र यांनी सध्या महिलांसाठी सहा लोकल असून आणखी फे ऱ्यांचे नियोजन के ले जात असल्याचे सांगितले. आठवडय़ाभरात त्याबाबत निर्णय होईल, असेही ते म्हणाले.
तासन्तास रांगेत
सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची संख्या वाढते आहे. तिकीट खिडक्यांवर होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेऊन सकाळी अर्धा ते पाऊण तास आधीच रांगा लावल्या जात आहेत. तिकीट खिडक्यांची संख्या कमी असल्याने रांगेत तासन्तास जातात. याचा महिला प्रवाशांना मनस्ताप होतो. पश्चिम रेल्वे उपनगरीय स्थानकात टाळेबंदीआधी २९२ तिकीट खिडक्या सुरू होत्या. १८ ऑक्टोबरला तिकीट खिडक्यांची संख्या १३३ होती. २४ ऑक्टोबरला हीच संख्या २७० पर्यंत पोहोचली आहे. आणखी तिकीट खिडक्या येत्या आठवडय़ाभरात सुरू के ल्या जातील, असेही ठाकू र यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 27, 2020 1:28 am