01 March 2021

News Flash

सिंचनासाठी ४ हजार कोटी

आंतर-मंत्रालय निधीवाटप वित्त समितीने हा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवला आहे.

विदर्भ आणि मराठवाडय़ासाठी केंद्राकडून नवा निधी

सातत्याने शेती क्षेत्रातील संकटांना सामोरे जाणाऱ्या विदर्भ आणि मराठवाडय़ातील जलसिंचन प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडून सुमारे ४ हजार कोटींची विशेष आर्थिक मदत केली जाणार आहे. आंतर-मंत्रालय निधीवाटप वित्त समितीने हा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवला आहे. राज्यातील या दोन्ही प्रदेशांमधील जलसिंचन प्रकल्पांच्या विकासासाठी १४ हजार कोटींची तरतूद केली जाणार असून उर्वरित सुमारे १० हजार कोटी रुपये राज्य सरकारला उभे करायचे आहेत.

या विशेष निधीसाठी ९ एप्रिल रोजी पंतप्रधान कार्यालयात बैठक झाली होती. यात मांडल्या गेलेल्या प्रस्तावाचा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी पाठपुरावा केला होता. याआधी विविध योजनेअंतर्गत (उदा. शेत तिथे पाणी योजना वगैरे) होत असलेल्या निधीपुरवठय़ाव्यतिरिक्त हा निधी दिला जाणार आहे.

या प्रस्तावानुसार, ८३ लघु जलसिंचन प्रकल्पांचा विकास केला जाणार असून त्यापैकी विदर्भात ६६ तर, मराठवाडय़ात १७ प्रकल्प आहेत. शिवाय, ८ मोठय़ा व मध्यम जलसिंचन प्रकल्पांचाही समावेश आहे. या सिंचन प्रकल्पांमुळे ३ लाख ७६,९१५ हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकेल. या सर्व प्रकल्पांचा अंदाजित खर्च १३,६५१.६१ कोटी इतका आहे. त्यासाठी केंद्र सरकार ३,४१२.९० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहे. उर्वरित ९,८२०.२० कोटी रुपये राज्य सरकार अर्थसंकल्पातून उभे करेल वा नाबार्डच्या माध्यमातून निधीपुरवठा केला जाईल. याशिवाय, जलसिंचन प्रकल्पांवर गेल्या वर्षी (२०१७-१८) राज्य सरकारने १,६७४.०४ कोटी रुपये खर्च केले, त्यापैकी ४१८.५१ कोटींचा निधीही केद्राकडून दिला जाणार आहे.

विदर्भ व मराठवाडय़ातील १४ जिल्ह्य़ांतील ६.४० टक्के जमिनीच सिंचनाखाली आहे. ९३.६ शेतजमीन पावसावरच अवलंबून आहे. त्यामुळे या प्रदेशांत सिंचनाचे प्रकल्प विकसीत करणे गरजेचेअसल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2018 4:52 am

Web Title: 4 thousand crores for irrigation by central government
Next Stories
1 ३७ ग्राहकांचे १३ कोटी सव्याज परत करा!
2 औषधांच्या दुष्परिणामांमुळे रुग्ण दगावण्याच्या घटना गंभीर!
3 पनवेलजवळ विचित्र अपघातात पाच जणांचा मृत्यू
Just Now!
X