८० विद्युत गाडय़ा दाखल होणार

मुंबई : बेस्ट उपक्रमात दाखल होणाऱ्या ८० विद्युत मिडी बसपैकी ४० बस वातानुकूलित असणार आहेत. या उप्रकमामध्ये बेस्ट आणि खासगी कंपन्यांच्या सहभाग असेल. सेवेत दाखल होणाऱ्या या नव्या बसची जबाबदारी खासगी वाहतूकदार किंवा कंपनीकडे सोपविण्याच्या प्रस्तावास सोमवारी बेस्ट समितीच्या  बैठकीत मान्यता देण्यात आली.

बेस्ट उपक्रमाच्या सेवेतून वातानुकूलित बसला बाद केल्यावर त्या पुन्हा सेवेत आणण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने वातानुकूलित बस सेवेत आणण्याचा प्रस्ताव आखला होता. ९ मीटर लांबीच्या एकूण ८० मिडी बस सेवेत घेण्याचा निर्णय बेस्टने घेतला. त्यादृष्टीने नव्याने दाखल होणाऱ्या विद्युत मिडी बसपैकी अध्र्या बस या वातानुकूलित असतील.

या बसच्या देखभालीची जबाबदारी बेस्टसह खासगी कंपनीची असेल. त्यातील ६० टक्के वाट बेस्टचा तर ४० टक्के  वाटा नेमण्यात आलेल्या खासगी कंपनीचा असेल. सोमवारी झालेल्या बैठकीत वातानुकूलित बससह अन्य मिडी बससाठी प्रत्येकी १ कोटी २२ लाख रुपये दर मान्य करण्यात आला.