मुंबईत गेल्या २४ तासात १४१३ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतल्या करोनाग्रस्तांची संख्या आता ४० हजार ८७७ झाली आहे. तर गेल्या चोवीस तासात ४० जणांचा मृत्यू झाला आहे अशीही माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. त्यामुळे मुंबईकरांची चिंता निश्चितच वाढली आहे. ३४ नवे रुग्ण धारावीत आढळले आहेत. त्यामुळे धारावीतल्या रुग्णांची संख्या १८०५ इतकी झाली आहे असंही मुंबई महापालिकेने सांगितलं आहे.

महाराष्ट्राची रुग्णसंख्या ७० हजारांच्याही पुढे

महाराष्ट्रात करोनाचे २३६१ रुग्ण आढळले आहेत. तर ७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या ७० हजार १३ इतकी झाली आहे.२४ तासात ७७९ करोना रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत ३० हजार १०८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात सध्याच्या घडीला ३७ हजार ५३४ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.

सध्याच्या घडीला महाराष्ट्रात ५ लाख ६७ हजार ५५२ होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. ३६ हजार १८९ लोकांना संस्थात्माक क्वारंटाइन करण्यात आलं आहे. दरम्यान ७२ हजार ७०४ बेड्सही संस्थात्मक क्वारंटाइनसाठी उपलब्ध आहेत असंही आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.