24 February 2021

News Flash

महाराष्ट्रात आणखी आठ एकात्मिक वस्त्रोद्योग संकुले

‘मेक इन इंडिया’ सप्ताह मंचावर राज्याची घोषणा

'मेक इन इंडिया'ला धक्का: टेस्लाची भारताकडे पाठ

४० हजार कोटींची गुंतवणूक, ११ हजार रोजगार; ‘मेक इन इंडिया’ सप्ताह मंचावर राज्याची घोषणा
मेक इन इंडिया सप्ताहाच्या मुहूर्तावर रेमंडच्या रूपात राज्यात पहिल्या एकात्मिक वस्त्रोद्योग संकुल योजना मार्गी लागल्याने उत्साहित झालेल्या महाराष्ट्राने या धर्तीवर राज्यात आणखी ८ वस्त्रोद्योग संकुले उभारण्याचा संकल्प केला आहे. यामार्फत राज्यात ४०,००० कोटींची गुंतवणूक होणार असून ११ हजार रोजगारनिर्मिती होईल.
लिनन प्रकारच्या वस्त्रनिर्मितीसाठी राज्यातील औद्योगिक विकास महामंडळाने रेमंडबरोबर शनिवारी पंतप्रधानांच्या उपस्थितीत करार केला होता. १,४०० कोटींच्या या अमरावती जिल्हय़ातील नांदगाव पेठेतील प्रकल्पाचा लाभ परिसरातील ५,००० शेतकऱ्यांना होणार आहे. अशी आणखी संकुले उभारण्यासह त्यातील प्रकल्प, गुंतवणूकदारांना ५० टक्क्यांपर्यंत अनुदान, सवलती देण्यात येणार आहेत.
भारतीय औद्योगिक महासंघ व केंद्रीय व्यापार धोरण व प्रोत्साहन विभागाच्या वतीने आयोजित मेक इन इिंडया सप्ताहांतर्गत रविवारी महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग चर्चासत्र रंगले. त्यात या क्षेत्रातील उद्योजक, संघटना तसेच शासकीय अधिकारी सहभागी झाले होते. याचदरम्यान मुख्यमंत्र्यांनीही चर्चेत सहभाग घेतला.
महाराष्ट्र शासनाने तयार केलेल्या वस्त्रोद्योग धोरणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यासाठी महत्त्वाचे हे क्षेत्र देशाच्या मेक इन इंडिया उपक्रमासाठी प्रोत्साहनपूरक ठरेल. राज्यातील कापूस उत्पादनाला चालना देण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय नाममुद्रांनाही नव्या वस्त्रोद्योगांमध्ये स्थान देण्यात येईल. देशी व विदेशी वस्त्रांच्या उत्पादनांच्या जोरावर मेक इन इंडिया मोहीम बळकट करता येईल, असेही ते म्हणाले.
सहकार व पणनमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यात २५० सूतगिरण्या, २०० सूत हातमाग केंद्रे तसेच २००० वस्त्रनिर्मिती प्रकल्प साकारण्याची क्षमता असून, मेक इन इिंडयाच्या माध्यमातून त्याला चालना मिळेल. कापूस प्रक्रिया क्षेत्रात ३० टक् क्यांपर्यंत भांडवल अनुदान तसेच महाराष्ट्रात वस्त्रनिगडित प्रकल्पांमध्येच गुंतवणूक करणाऱ्यांना सवलती देण्यात येतील.
उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले, कापूस उत्पादक भागातच नवीन वस्त्र उद्याने साकारण्यात येणार असून त्याची सुरुवात नांदगाव पेठ, अमरावतीच्या माध्यमातून झाली आहे. या भागात कापूस प्रक्रियेशी निगडित प्रकल्प व अन्य गुंतवणूक करणाऱ्यांना ५० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाणार असल्याचेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2016 2:44 am

Web Title: 40 thousand crore investment in maharashtra
टॅग Make In India
Next Stories
1 राज्याचे साडे चार लाख कोटींचे सामंजस्य करार लक्ष्य
2 संशोधनासाठी सिलिकॉन व्हॅलीसारखे वातावरण तयार करू – फडणवीस
3 पर्यटनासाठी पाच राज्यांशी करार
Just Now!
X