14 August 2020

News Flash

तोटा सहन न झाल्याने व्यापाऱ्याची आत्महत्या, मुंबईतल्या पवईत कारमध्ये आढळला मृतदेह

दोन दिवस कारमधून दुर्गंधी येत असल्याने स्थानिकांनी केली पोलिसांकडे तक्रार

आर्थिक नुकसान सहन न झाल्याने मुंबईतील पवई या ठिकाणी एका व्यावसायिकाने त्याच्या कारमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. विनीत सिंग असं या व्यावसायिकाचं नाव आहे. तो सोलार उपकरणांचा व्यापारी होता. मात्र लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर त्याला प्रचंड आर्थिक झळ बसली जी सहन न झाल्याने त्याने कारमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांना या ठिकाणी कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. त्याने आपल्याला दिल्लीला जायचे आहे असे घरी सांगितले होते. बुधवारी हे कारण देऊन तो घराबाहेर पडला होता. शुक्रवारी मुंबईतील पवई भागात कारमध्ये त्याचा मृतदेह आढळला.

विनीत सिंगने दोन बँकांमधून कर्ज घेतलं होतं. तसंच तो सोलार उत्पादनांचा व्यवसाय करत होता. त्याला दारुचंही व्यसन होतं. लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर त्याला व्यवसायात तोटा सहन करावा लागला. विनीतचा मृतदेह जैन मंदिर मार्गावर असलेल्या कारमध्ये सापडला. कारमधून मोठ्या प्रमाणत दुर्गंधी येत होती, ज्यासंबंधीची तक्रार स्थानिकांनी केली होती. त्यानंतर घटनास्थळी पोलीस आले आणि सदर प्रकार उघडकीस आला अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर कांबळे यांनी दिली. फ्री प्रेस जर्नलने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2020 5:07 pm

Web Title: 41 year old man hangs self inside parked car in powai mumbai scj 81
Next Stories
1 अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल रेल्वे संबंधित महत्वाची बातमी
2 राज ठाकरेंच्या घरात करोनाचा प्रवेश; घरकाम करणाऱ्या दोघांना लागण
3 सुशांत सिंह राजपूत आत्महत्या: यशराज फिल्मसच्या दोन माजी अधिकाऱ्यांची पाच तास चौकशी
Just Now!
X