शहाजी उमप, शरद नाईक, भोपाळे आदींचा समावेश

राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक बिपिनकुमार सिंग, राज्य राखीव पोलीस दलाचे सहायक समादेशक भास्कर महाडिक, मुंबई पोलीस दलातील सहायक आयुक्त दिनेश जोशी आणि रत्नागिरी येथील सहायक उपनिरीक्षक विष्णू नागले यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे.

उपायुक्त शहाजी उमप, सहायक आयुक्त शरद नाईक, पोलीस निरीक्षक नंदकुमार भोपाळे, नितीन अलकनुरे, सचिन राणे यांच्यासह राज्यातील ४० पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले.

पदक जाहीर झालेले अन्य पोलीस अधिकारी – मनोज पाटील (अधीक्षक, सोलापूर ग्रामीण), सतीश माने (उपअधीक्षक, कोल्हापूर मुख्यालय), गणपतराव माडगूळकर (पुणे ग्रामीण), गणपत तरंगे (सशस्त्र निरीक्षक, दौंड), मंगेश सावंत (वरिष्ठ निरीक्षक, दहिसर), नितीन अलकनुरे (एमआयडीसी), सचिन राणे (गुन्हे अन्वेषण विभाग, नवी मुंबई), निरीक्षक अरविंद गोकुळे (खंडाळा), संजय पुरंदरे (नागपूर ग्रामीण), नंदकुमार गोपाळे (खार), सचिन कदम (खंडणीविरोधी कक्ष), गजानन पवार (गुन्हे अन्वेषण विभाग), धनश्री करमरकर (महासंचालक कार्यालय), अनिल परब (सहायक निरीक्षक, राज्य गुप्तचर विभाग), अर्जुन शिंदे (उपनिरीक्षक, पालघर), सत्यवान राऊत (राज्य गुप्तचर विभाग), नंदकुमार शेलार (सहायक उपनिरीक्षक, खंडणीविरोधी कक्ष), अशोक भोसले (गुन्हे अन्वेषण, पुणे), विलास मोहिते (नाशिक), प्रदीप पाटील (रायगड), राजकुमार वारुडकर (अमरावती), लक्ष्मण थोरात (पुणे), मोहन घोरपडे (सातारा), गिरीधर देसाई (पुणे), पुरुषोत्तम देशपांडे (कराड), अमरसिंग चौधरी (औरंगाबाद), मनोहर खानगावकर (कोल्हापूर), जाकीर हुसैन गुलाम हुसैन शेख (नाशिक), दत्तात्रय चौधरी व सुनील कुलकर्णी (दोघेही पुणे), हेडकॉन्स्टेबल गणपती डाफळे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई), कृष्णा जाधव (खंडणीविरोधी कक्ष), पांडुरंग तळावडेकर (ना. म. जोशी मार्ग), अरुण कदम (कुरार), दयाराम मोहिते व दत्तात्रय कुढले (दोन्ही गुन्हे अन्वेषण, मुंबई), भानुदास मनवे (राज्य गुप्तचर विभाग), विनोद ठाकरे, अकोला.