ट्रेडमार्क नोंदणीकृत करण्यासाठी  बोगस दस्तावेज बनवून एका चित्रपट लेखकाला चक्क एका वकिलाने तब्बल ४५ लाखाचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रायटर अमरीश गोपाळ शहा यांनी फसवणूक प्रकरणी डी. एन नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून आरोपी वकील येशू राजा चढा याला गोव्यातून अटक केली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. अटक वकिलाला न्यायालयात हजर केले असता त्याला २१ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

अंधेरी परिसरात राहणारे अमरीश शहा टीव्ही आणि बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध लेखक म्हणून काम करतात. त्यांनी आतापर्यंत अनेक लेख, मालिका आणि चित्रपटासाठी लेखन केलेलं आहे. त्या सर्व लेखनाची नोंदणी बौद्धिक संपदा विभाग कार्यालयात केली आहे. मागील वर्षी ऑस्ट्रेलिया येथे शहा यांनी सहा महिन्याचा सिडनी येथे सायन्स हेल्थ प्रोग्राम आणि वेलनेस कोर्स ऑनलाईन स्वरुपात पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी स्वतःचा ब्रेन हेल्थ प्रोग्राम आणि टेक्निक्स विकसित करून त्याची नोंदणी करण्यासाठी  येशू चद्दा यांच्यावर जबाबदारी सोपविली. गेल्या महिन्यात शहा यांनी नोंदणीसाठी तब्बल ५२ दस्त दिले. येशू यांनी आपल्या व्यक्तीगत कामासाठी आणि नोंदणीसाठी तब्बल ४५ लाख रुपये शहा यांच्याकडून घेतले. ५२ पैकी केवळ १० दस्तावेजाची नोंदणी करण्यात आली. यामुळे संशय आल्याने शहा यांनी येशू यांच्यामागे तगादा लावला. आणि त्यांच्या जागी नवा वकील विश्वमय श्रॉफ यांची नियुक्ती केली. शहा यांनी येशू यांच्याकडून नोंदणीसाठी दिलेले सर्व दस्त परत मागवले पण ते परत मिळाले नाही  आणि ते येशू यांनी न  देता २५ लाख ९० हजाराचा धनादेश पाठविला. मात्र बँकेत येशू यांचा धनादेश वाटलंच नाही. फेब्रुवारी २०१८ रोजी अमरीश शहा यांनी येशू यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने या याचिकेवर डी एन नगर पोलिसांना चौकशीचे आदेश दिले. सादर प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक परमेश्वर गणसे यांनी अजितकुमार वर्तक यांच्याकडे सोपविला. न्यायालयात याचिका दाखल केळ्याचे समजताच वकील पेशाने असलेल्या येशू याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात प्रयत्न केले. मात्र न्यायालयाने अर्ज फेटाळल्याने हताश येशू हा अटक टाळणायसाठी गोवा येथे निघून गेला. मात्र पोलिसांनी येशूला गोव्यात जाऊन अटक केली आणि अंधेरीच्या डी एन नगर पोलीस ठाण्यात आणले. सध्या वकील येशू हा पोलीस कोठडीत बंदिस्त आहे.