28 September 2020

News Flash

टेन्शन कायम! ४७ नवे करोना पॉझिटिव्ह, महाराष्ट्रातली रुग्णसंख्या ५३७

४७ पैकी ४३ रुग्ण मुंबई ठाण्यातले आहेत

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या ४७ ने वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता ५३७ करोनाग्रस्त आहेत. महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. या ४७ रुग्णांपैकी ४३ रुग्ण मुंबई आणि ठाण्यातले आहेत. त्यामुळे चिंता आणखी वाढली आहे. २८ पॉझिटिव्ह रुग्ण मुंबईत तर १५ पॉझिटिव्ह रुग्ण ठाण्यात सापडले आहेत. अमरावतीत १ रुग्ण, २ पुण्यात, तर पिंपरीत १ रुग्ण सापडला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातली रुग्णसंख्या ५३७ वर गेली आहे. शुक्रवारी रात्रीपर्यंत ही संख्या ४९० होती. आता ही संख्या ५३७ झाली आहे.

महाराष्ट्रासह देशभरात लॉकडाउन आहे. सर्व प्रकारची खबरदारी घेतली जाते आहे. ज्या ठिकाणी करोनाचे रुग्ण आढळतात तो भाग सील केला जातो आहे. असं असलं तरीही दररोज वाढणारे रुग्ण ही बाब चिंतेत भर घालणारी ठरते आहे. १४ एप्रिलपर्यंत टाळेबंदी आहे. अशात आता देशातलीही संख्या वाढत चालली आहे. महाराष्ट्रातही लॉकडाउन आहेच. लॉकडाउनचे नियम काटेकोरपणे पाळा अन्यथा आज बाहेर फिरणारे उद्या रुग्णालयांमध्ये दिसतील असंही अजित पवार यांनी गुरुवारीच म्हटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2020 12:23 pm

Web Title: 47 fresh coronovirus positive cases reported in maharashtra the state rises to 537 says maharashtra health department scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 Video: कबूल… कबूल… कबूल… व्हिडीओ कॉलवर केले विवाहाचे सोपस्कार
2 Coronavirus: समाजाची जबाबदारी मोठी, नुसता यंत्रणांना दोष नको – राज ठाकरे
3 दिवे लावण्यापेक्षा पंतप्रधानांनी आशेचा किरण दाखवायला हवा होता – राज ठाकरे
Just Now!
X