06 March 2021

News Flash

मुंबईत दिवसभरात ४७३ रुग्ण, ८ मृत्यू

६ हजार ६५४ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबईत करोनाच्या आणखी ४७३ रुग्णांची मंगळवारी नोंद झाली, तर ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या घटली असून ६ हजार ६५४ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.  मुंबईतील करोना नियंत्रणाची स्थिती सुधारत असून मंगळवारी ४७३ नवीन रुग्ण आढळल्यामुळे एकूण बधितांची संख्या ३ लाख ३ हजार ६२१ झाली आहे. तर  एका दिवसात ४८६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे आतापर्यंत  २ लाख ८४ हजारांहून अधिक म्हणजेच ९४ टक्के  रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट झाली असून सध्या ६ हजार ६५४ रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यापैकी सुमारे दोन हजार रुग्णांना लक्षणे आहेत. सुमारे ३०० रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. मुंबईतील रुग्णवाढीचा सरासरी दर ०.२१ टक्कय़ावर स्थिर आहे. रुग्ण दुपटीचा सरासरी कालावधी तब्बल ४१२  दिवसांपर्यंत म्हणजे सुमारे एक वर्षांहून जास्त झाला आहे. दर दिवशी आढळणाऱ्या रुग्णांमध्ये  लक्षणेविरहीत रुग्ण मोठय़ा संख्येने आढळू लागले आहेत. त्यामुळे गंभीर स्थितीतील रुग्णांची आणि पर्यायाने दैनंदिन मृतांची संख्याही घटली आहे.  मंगळवारी ८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. गेल्या नऊ महिन्यांत करोनामुळे दगावलेल्यांची  एकूण संख्या  ११ हजार २५७ झाली आहे.

ठाणे जिल्ह्यात ३०० नवे रुग्ण

ठाणे : ठाणे जिल्ह्यात मंगळवारी ३०० नवे करोनारुग्ण आढळून आले. तर सहा जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा २ लाख ५० हजार ३५ इतका झाला असून मृतांचे प्रमाण ६ हजार ६३ इतके झाले आहे. मंगळवारी ठाणे महापालिका क्षेत्रात ११९, कल्याण डोंबिवली ६० बाधित आढळले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2021 12:22 am

Web Title: 473 patients in a day in mumbai abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ‘शिवसेनाप्रमुखांचे नाव किती ठिकाणी द्यायचे याचा निर्णय घ्या’
2 बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे २३ जानेवारीला अनावरण
3 काठिण्य पातळीनुसार इंग्रजी आणि संस्कृतची निवड
Just Now!
X