तीन महिन्यांतील मोठी वाढ

विदर्भातील चार जिल्ह्य़ांत जमावबंदी

heatstroke, 5 cases, maharashtra heatstroke cases
राज्यात उष्माघाताचे पाच नवे रुग्ण सापडले, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ८२ वर
Good availability of betel leaf from overseas at affordable rates
परराज्यांतील पानांमुळे विड्यांना रंग; जाणून घ्या… कुठून येतात राज्यात पाने?
maharashtra heatstroke marathi news, risk of heatstroke in maharashtra
उष्माघाताचा धोका वाढला! राज्यात १३ रुग्णांची नोंद; जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक प्रकोप
Chance of unseasonal rain in some parts of the state including the country in the next 24 hours
पारा चाळीशी पार…मात्र आता पडणार पाऊस; येत्या २४ तासात…

आठवडय़ानंतर निर्बंधांचे संकेत

राज्यात करोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या काही महिन्यांपासून मंदावलेला करोनाप्रसार वेगाने सुरू असून, राज्यात गेल्या चोवीस तासांत ४,७८७ रुग्ण आढळले. ऑक्टोबरनंतर एका दिवसातील ही उच्चांकी रुग्णवाढ आहे. त्यामुळे पुन्हा निर्बंध लागू करण्याचा विचार राज्य सरकारच्या पातळीवर सुरू आहे.

मुंबई, पुणे, ठाण्यासह नागपूर, अमरावतीमध्ये रुग्णसंख्येत बुधवारी मोठी वाढ झाली. खबरदारी म्हणून विदर्भातील ११ पैकी पाच जिल्ह्य़ांतील प्रशासनाने शाळा- महाविद्यालये बंद केली असून, चार जिल्ह्य़ांत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. इतर तीन जिल्ह्य़ांत रुग्ण वाढल्याने तेथेही हा आदेश काढण्यात येण्याची शक्यता आहे.

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ापासून राज्यातील प्रतिदिन सरासरी रुग्णसंख्या कमी होत गेली. डिसेंबरमध्ये प्रतिदिन हे प्रमाण तीन ते साडेतीन हजारांच्या आसपास होते. जानेवारी महिन्यात हे प्रमाण दोन हजारांवर आले होते. यातूनच राज्य सरकारने निर्बंध शिथिल करीत सर्वसामान्यांसाठी उपनगरीय रेल्वेसेवा सुरू केली. परंतु रुग्णसंख्येत अचानक वाढ झाल्याने काही निर्बंध लागू करावे लागतील, असे संकेत सरकारमधील उच्चपदस्थांकडून दिले जात आहेत.

विदर्भात वाशीममध्ये पंधरा दिवसांपासून दुपटीने रुग्ण वाढून रोज ५० च्या जवळपास रुग्ण आढळत आहेत. वर्धा येथे पूर्वी रोज ३० ते ६० रुग्ण आढळायचे. आता १५ दिवसांपासून ९० च्या जवळपास बाधित आढळत आहेत. नागपुरात दहा दिवसांपासून सातत्याने ४०० ते ५०० रुग्ण आढळत आहेत. मंगळवारी ५३५ रुग्ण आढळले. जानेवारीअखेर येथे १५० ते ३५० दरम्यान रुग्ण आढळत होते. रुग्ण वाढल्याने नागपूरसह वरील सर्व जिल्ह्य़ांत लग्न समारंभात ५० लोकांच्याच उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली आहे. नागपूरसह काही जिल्ह्य़ांत लग्न समारंभावर लक्ष केंद्रित करून कारवाईही सुरू झाली आहे. यवतमाळ जिल्ह्य़ातही पूर्वी रोज पन्नासपेक्षा कमी रुग्ण आढळायचे. आता तेथेही ११ फेब्रुवारीपासून ८० ते १०० च्या जवळपास बाधित आढळत आहेत. त्यामुळे येथे जिल्हाधिकाऱ्यांनी टाळेबंदीचा इशारा दिला आहे. गडचिरोलीत बुधवारी ११, चंद्रपूर २२, गोंदिया ७, भंडारा १४ नवीन रुग्ण आढळले.

विदर्भातील परिस्थिती

अमरावती जिल्ह्य़ात जानेवारीअखेर रोज २०० ते २५० च्या दरम्यान नवीन रुग्ण आढळत होते. मात्र दहा दिवसांपासून अचानक रुग्णसंख्या पाचशेच्या जवळपास गेली आहे. बुधवारीही येथे ४९८ रुग्ण आढळले, तर ६ जणांचा मृत्यू झाला. बुलढाण्यात जानेवारीअखेर सुमारे ५० रुग्ण आढळायचे. १ ते १५ फेब्रुवारीदरम्यान येथे ९७१ नवीन रुग्णांची भर पडली. बुधवारी १९९ रुग्ण आढळले.

मराठवाडय़ात २९० रुग्ण

मराठवाडय़ात बुधवारी २९० रुग्ण आढळले. यात औरंगाबाद मनपा हद्दीत ९६, ग्रामीणमध्ये २४ मिळून १२० रुग्णांची भर पडली. जालन्यातील ग्रामीण भागात ६६, परभणी मनपा हद्दीत १० तर ग्रामीणमध्ये ५, हिंगोलीच्या ग्रामीण भागात १०, नांदेड पालिका हद्दीत १२ तर ग्रामीणमध्ये ७, बीडच्या ग्रामीण भागात १९, लातूर पालिका हद्दीत १६ तर ग्रामीणमध्ये १३ तर उस्मानाबादच्या ग्रामीण भागात १२ रुग्ण आढळले.

उपाययोजना..

अकोला, बुलढाणा, वाशीम, वर्धा, अमरावती या जिल्ह्य़ात शाळा- महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. अकोला, बुलढाणा, वाशीम, अमरावती जिल्ह्य़ात एकाच ठिकाणी पाचहून जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही.

 अकोल्यात करोना लशीची चोरी

अकोला : पातूर तालुक्यातील चतारी येथील ग्रामीण रुग्णालयातून चक्क करोना प्रतिबंधक लशीचीच चोरी करण्यात आली. याप्रकरणी चान्नी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून समितीमार्फतही चौकशी करण्यात येत आहे. लस गहाळ झाल्यावर तब्बल ४ दिवसांनी तक्रार दाखल करण्यात आल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप होत आहे. १२ फेब्रुवारीला कक्षातील परिचारिकांचा पदभार बदलत असताना लशींचे ७ डबे गहाळ झाल्याचे लक्षात आले. एका डब्यामध्ये १० मात्रा असतात. एकूण ७० मात्रा गहाळ झाल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली. करोना लशीचे ७ डबे गहाळ झाल्याची तक्रार प्राप्त झाल्याची माहिती चान्नीचे ठाणेदार राहुल वाघ यांनी दिली.

गर्दीच्या ठिकाणांवर करडी नजर

मुंबई : मुंबईत बुधवारी ७२१ नवे रुग्ण आढळले. रुग्णसंख्या वाढू लागल्याने महापालिका सतर्क झाली असून, गर्दीच्या ठिकाणांवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. करोनाविषयक नियमांचे उल्लंघन करणारी हॉटेल्स, मंगल कार्यालयांवर कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे गुरुवारपासून मुंबईत कारवाईचा धडाका सुरू होण्याची शक्यता आहे.

कठोर उपाययोजना

मुंबई : राज्यातील विविध भागांत करोनाची रुग्णसंख्या वाढू लागल्याबद्दल बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये, यासाठी मुखपट्टी न वापरणाऱ्यांवर कारवाई, मंगल कार्ये-सोहळ्यांमध्ये लोकांच्या उपस्थितीची संख्या मर्यादित ठेवणे यांसारख्या उपाययोजना कठोरपणे राबविण्यात येणार आहेत. त्यानंतरही गरज भासल्यास आठवडय़ाभराने कठोर निर्बंध लागू करण्यावर मंत्रिमंडळात सहमती झाली.