News Flash

मुंबईत लससाठ्याअभावी ४९ केंद्रे बंद

मुंबईत आतापर्यंत २० लाख ४३ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र

गेल्या आठवड्यापासून सुरू झालेली लसटंचाई अद्याप दूर झाली नसून मंगळवारी तब्बल ४९ केंद्रे  लससाठ्याअभावी बंद ठेवावी लागली. त्यात पालिकेच्या सहा व राज्य आणि केंद्र सरकारच्या पाच केंद्रांचाही समावेश आहे. त्यामुळे एकूण लसीकरणाच्या वेगावर त्याचा परिणाम झाला असून दैनंदिन लसीकरणाचे प्रमाण घटले आहे.

मुंबईत मंगळवारी ३९ हजार ५२२ नागरिकांना लस देण्यात आली. त्यापैकी १५ हजार ५१ नागरिकांनी लशीची दुसरी मात्रा घेतली. मुंबईत सध्या १२९ केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. त्यात पालिके ची ३९, राज्य व केंद्र सरकारची १७, खासगी ७३ केंदे्र आहेत. त्यात खासगी केंद्रावर दिवसभरात ७,४९३ नागरिकांचे लसीकरण होऊ शकली. लशीचा साठा पुरेसा नसल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून काही खासगी केंदे्र बंद ठेवावी लागली होती. मात्र मंगळवारी पालिके ची व सरकारी केंद्रेही बंद ठेवावी लागली. काही केंद्रावर फक्त एकाच पाळीत लसीकरण झाले.

मुंबईत आतापर्यंत २० लाख ४३ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

त्यापैकी २ लाख ७६ नागरिकांनी लशीची दुसरी मात्रा घेतली आहे. एकूण लसीकरणात पालिके च्या के ंद्रांवर सर्वाधिक म्हणजे १३ लाखाहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2021 1:02 am

Web Title: 49 centers closed in mumbai due to lack of vaccine abn 97
Next Stories
1 अन्न व औषध प्रशासन आयुक्तांची उचलबांगडी
2 ‘शिंगणे यांच्या स्पष्टीकरणामुळे सरकारची कोंडी’
3 न्यायालये जामिनास नकार देत असल्यानेच कारागृहांमध्ये करोना!
Just Now!
X