News Flash

दामूनगर आगीतील जखमींची प्रकृती सुधारतेय

दामूनगरच्या आगीत दोन जण मृत तर अकरा जखमी झाले होते.

कांदिवलीमध्ये दामूनगर वस्तीत सोमवारी लागलेल्या आगीनंतर उपचारांसाठी डॉ. आंबेडकर रुग्णालयात दाखल असलेल्या पाच जणांची प्रकृती सुधारत असल्याचे रुग्णालयामधून सांगण्यात आले.

कांदिवलीमध्ये दामूनगर वस्तीत सोमवारी लागलेल्या आगीनंतर उपचारांसाठी डॉ. आंबेडकर रुग्णालयात दाखल असलेल्या पाच जणांची प्रकृती सुधारत असल्याचे रुग्णालयामधून सांगण्यात आले. या दुर्घटनेतील आणखी एका मृतदेहाची ओळख पटली असून हा मृतदेह महिलेचा आहे.
दामूनगरच्या आगीत दोन जण मृत तर अकरा जखमी झाले होते. जखमींपैकी ६० वर्षांच्या पार्वती नानुबा या ३० टक्के भाजल्या होत्या. आगीपासून बचाव करताना त्यांच्या दोन्ही हातांना जखमा झाल्या होत्या. त्यांची प्रकृती आता सुधारत आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या इतर चौघांच्याही प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉ. आंबेडकर रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. के. जी. पिंपळे यांनी सांगितले. इतर सहाजणांना घरी सोडण्यात आले.

मृतदेहाची ओळख पटली
दामूनगर वस्तीमध्ये लागलेल्या आगीत मरण पावलेल्या आणखी एका मृतदेहाची ओळख पटली असून तो मृतदेह महिलेचा आहे. नानेबाई उत्तम हिवाळे असे या मृत महिलेचे नाव आहे. आग लागली तेव्हा या घरातच होत्या. मात्र आजारी असल्याने त्या बाहेर पडू शकल्या नाहीत आणि त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते.

तातडीने मदत हवी
आगीत होरपळलेल्या संसारांना राज्य सरकारने तातडीने मदत करावी व या जळीतग्रस्तांचे पक्की घरे देऊन पुनर्वसन करावे, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले व रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी केली आहे. या आगीत दामूनगरमधील सुमारे दोन हजाराहून अधिक झोपडय़ा जळून खाक झाल्या. तेवढी कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. अंगावरच्या कपडय़ाशिवाय त्यांच्याकडे काहीही शिल्लक राहिले नाही. आठवले यांनी मंगळवारी सकाळी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2015 3:26 am

Web Title: 5 injured in fire at damu nagar slum recovered quickly
Next Stories
1 मोबाइलवर मराठीला सुगीचे दिवस
2 विधान परिषद निवडणुकीत चुरस
3 वातानुकूलित डबलडेकर प्रवाशांच्या सेवेत