07 March 2021

News Flash

‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांसाठी पालिके चे ५० कोटी

करोनामुळे मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत

करोनामुळे मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत

मुंबई : करोनाकाळात कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या ‘बेस्ट’ उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये मिळणार आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक साहाय्य देता यावे यासाठी पालिकेने बेस्टला ५० कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर कार्योत्तर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. बेस्टमध्ये करोनामुळे सुमारे १०० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

करोनामुळे मृत्यू झालेल्या पालिका कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रशासनाने भरपाईपोटी ५० लाख रुपये दिले आहेत. त्याबाबत प्रक्रियाही सुरू आहे. त्याचप्रमाणे बेस्टच्या कर्मचाऱ्यांसाठीही योजना असावी आणि पालिके ने अर्थसाहाय्य करावे, अशी विनंती बेस्ट उपक्रमाने पालिके कडे केली होती. त्यामुळे पालिका प्रशासनाने २०२०-२१ च्या म्हणजेच चालू अर्थसंकल्पातच सुधारित तरतूद केली आहे.

बेस्टने करोनाच्या सुरुवातीच्या कालावधीपासून आपत्कालीन सेवा पुरविण्याचे काम केले. लोकल गाडय़ा बंद होत्या. त्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी बेस्टने प्रवास करीत होते. मात्र या काळात बेस्टचे १०० कामगार करोनाने मृत्युमुखी पडले. पालिकेने करोनामुळे मृत्यू झालेल्या प्रत्येक कामगाराच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांप्रमाणे ५० कोटी रुपये अर्थसाहाय्य बेस्ट उपक्रमाला दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2021 12:23 am

Web Title: 50 crore for the best employees from bmc zws 70
Next Stories
1 ‘मुख्यमंत्र्यांनी राठोडांचा राजीनामा घ्यावा’
2 निकिता जेकबच्या जामिनावर आज निर्णय
3 शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान
Just Now!
X