News Flash

मंत्रालय पत्रकारांना विशिष्ट गृहनिर्माण प्रकल्पात 50 टक्के आरक्षण

मंत्रालय व विधिमडळाचे दैनंदिन व नियमित वार्तांकन करणाऱ्यांना पत्रकारांकरिता ५० टक्केंपर्यंत आरक्षण देण्यात येणार आहे.

संग्रहित छायाचित्र

मंत्रालय व विधिमंडळाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांसाठी सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. या पत्रकारांना विशिष्ट गृहनिर्माण प्रकल्पात ५० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय शासनाने आज (बुधवार) घेतला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत पत्रकारांकरिता गृहनिर्माण योजना राबवताना मंत्रालय व विधिमंडळाचे दैनंदिन व नियमित वार्तांकन करणाऱ्यांना पत्रकारांकरिता ५० टक्केपर्यंत आरक्षण देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण विनियम १९८१ च्या विनियम १३ (२) खाली विशिष्ट गटासाठी म्हाडामार्फत गृहनिर्माण योजना राबवण्याबाबत शासनाच्या निर्णयाद्वारे हे धोरण ठरवण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2019 5:43 pm

Web Title: 50 percent reservation for reporter of mantralaya assembly in special housing projects
Next Stories
1 मुंबई : नामांकित बँकेच्या मॅनेजर तरुणीला लाखोंचा गंडा, दिल्लीतूल भामट्याला अटक
2 बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे गणेशपूजन
3 हार्बर रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत
Just Now!
X