News Flash

भायखळा तुरुंगातील ८२ महिला कैद्यांना विषबाधा

शुक्रवारी सकाळी भायखळा तुरुंगातील ४६ महिला कैद्यांची तब्येत बिघडली. महिला कैद्यांना उलट्या व पोटदुखीचा त्रास होऊ लागला.

संग्रहित छायाचित्र

भायखळा येथील महिला तुरुंगातील ८२ कैद्यांना विषबाधा झाल्याची घटना शुक्रवारी घडली. महिला कैद्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून विषबाधा झालेल्या कैद्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी सकाळी भायखळा तुरुंगातील ८२ महिला कैद्यांची तब्येत बिघडली. महिला कैद्यांना उलट्या व पोटदुखीचा त्रास होऊ लागला. अखेर त्यांना तातडीने जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले. एकूण ८२ महिला कैद्यांना रुग्णालयात आणण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जे जे रुग्णालयाचे प्रभारी डिन डॉ. मुकूंद तायडे यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 20, 2018 12:16 pm

Web Title: 50 prisoners of byculla jail food poisoning admitted to mumbais jj hospital
Next Stories
1 राष्ट्रीय उद्यानातील वाघाचा प्रवेश रद्द
2 २२ दिवसांच्या बाळाच्या शरीरात दोन सेंटीमीटरची सुई
3 खड्डय़ात पडून जखमी महिलेची प्रकृती चिंताजनक
Just Now!
X