News Flash

रेल्वेचे ‘तात्काळ’ महागले

महसूल वाढीसाठी रेल्वेने तात्काळ तिकिटे चढय़ा दराने विकण्याचा निर्णय घेतला आहे. याआधीही रेल्वेने काही गाडय़ांच्या तात्काळ तिकिटांपैकी ५० टक्के तिकिटे चढय़ा दराने विकण्याचा निर्णय घेतला

| January 21, 2015 02:00 am

महसूल वाढीसाठी रेल्वेने तात्काळ तिकिटे चढय़ा दराने विकण्याचा निर्णय घेतला आहे. याआधीही रेल्वेने काही गाडय़ांच्या तात्काळ तिकिटांपैकी ५० टक्के तिकिटे चढय़ा दराने विकण्याचा निर्णय घेतला होता. आता त्या गाडय़ांमध्ये आणखी काही गाडय़ांचा समावेश करत रेल्वेने प्रवाशांच्या खिशाला कात्री लावण्याच्या दृष्टीने एक पाऊल टाकले आहे.
तातडीच्या प्रवासासाठी प्रवाशांना तात्काळ तिकिटांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या तात्काळ तिकिटांपैकी ५० टक्के तिकिटे संपल्यावर उर्वरित ५० टक्के तिकिटे चढय़ा दराने विकण्यात येणार आहेत. म्हणजे १०० तिकिटे उपलब्ध असल्यास त्यापैकी पहिली काही तिकिटे एका विशिष्ट दरांत विकल्यानंतर मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन इतर तिकिटांचा दर वाढवण्यात येईल. हा दर २०० टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.
प्रिमीयम दर खालील गाडय़ांसाठी
* ११००५ दादर-पदुचेरी एक्स्प्रेस
* ११०२१ दादर-तिरुनेलवेली एक्स्प्रेस
* ११०५० श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर) – अहमदाबाद एक्स्प्रेस
* ११०८८ पुणे – विरावल एक्स्प्रेस
* ११०९० पुणे-भगत की कोठी (जोधपूर) एक्स्प्रेस
* ११०९२ पुणे-भूज एक्स्प्रेस
* ११०९६ पुणे-अहमदाबाद अहिंसा एक्स्प्रेस
* १२०५१ दादर-करमाळी जनशताब्दी एक्स्प्रेस
* १२१०१ लोकमान्य टिळक टर्मिनस – हावरा ज्ञानेश्वर एक्स्प्रेस
* १२१२९ पुणे – हावरा आझाद हिंद एक्स्प्रेस
* १२८०९ छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई – हावरा मेल व्हाया – नागपूर
* १६३५१ छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई – नगरकोईल एक्स्प्रेस
* १६३८१ छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई – कन्याकुमारी एक्स्प्रेस
* १८०२९ लोकमान्य टिळक टर्मिनस – शालीमार एक्स्प्रेस
* ११०६१ लोकमान्य टिळक टर्मिनस – मुजफ्फरपूर एक्स्प्रेस
* ११०६५ लोकमान्य टिळक टर्मिनस – दरभंगा एक्स्प्रेस

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2015 2:00 am

Web Title: 50 tatkal tickets on dynamic pricing
टॅग : Railway Tickets
Next Stories
1 विधान परिषद निवडणूक : देसाई, मेटे, जानकर आणि वाघ यांना उमेदवारी
2 निरीक्षक पदापर्यंतच्या बदल्याचे अधिकार पोलीस आस्थापना मंडळास
3 ऊस खरेदी करमाफीचा मंत्रिमंडळाचा निर्णय
Just Now!
X