गेला आठवडय़ापासून सुरू असलेल्या ‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’च्या तिसऱ्या पर्वाला  भरघोस प्रतिसाद मिळत आहे. २४ मार्चपासून सुरू झालेल्या या फेस्टिव्हलमध्ये खरेदीबरोबरच बक्षिसाचा आनंद लुटण्याची संधी मिळाली आहे. २४ ते ३१ मार्च या कालावधीत ५६ जणांना बक्षिसे मिळाली.

‘कलर्स’ वाहिनीवरील ‘चाहूल’ या मालिकेतील निर्मलाची भूमिका करणारी शाश्वती पिपंळीकर हिने विक्रोळी पूर्व येथील राम हजारे बाग, मार्केट रोड येथील सौभाग्य ज्वेलर्स या दुकानाला शनिवारी भेट दिली. ‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’चा विषय शाश्वतीला अतिशय भावला. खरेदी करताना आपल्याकडील ज्ञानाच्या आधारे बक्षिसे मिळविण्याची संधी या उपक्रमामुळे उपलब्ध झाली आहे. ‘लोकसत्ता शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये ग्राहकांना खरेदीबरोबर बक्षिसे जिंकण्याची संधी मिळाली आहे, असे शाश्वतीने सांगितले. या उपक्रमात कलाकारांनाही सामावून घेतल्यामुळे ग्राहकांचा आनंद द्विगुणित झाला आहे आणि हीच आमच्या कामाची पावती आहे, अशी भावना शाश्वतीने व्यक्त केली. ‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’ या उपक्रमामुळे ग्राहकांचा ओघ वाढला आहे, असे सौभाग्य ज्वेलर्सचे किरण साळुंखे यांनी सांगितले.

या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणाऱ्या ग्राहकांना दररोज सुवर्णमुद्रा, चांदीचे नाणे, एलईडी टीव्ही, फ्रिज, गिफ्ट कूपन अशी आकर्षक पारितोषिके जिंकता येणार आहेत. महोत्सवाच्या अखेरीस सोडतीद्वारे पहिल्या भाग्यवान ग्राहकाला कार व दुसऱ्या विजेत्याला ‘केसरी टुर्स’कडून सहलीचे पॅकेज दिली जाणार आहेत. ९ एप्रिलपर्यंत हा खरेदी महोत्सव सुरू राहणार आहे.

‘रिजेन्सी समूह’ प्रस्तुत ‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल’साठी ‘पितांबरी’ सहप्रयोजक आहेत. ट्रॅव्हल पार्टनर ‘केसरी टूर्स’, बँकिंग पार्टनर ‘युनियन बँक’, पॉवर्ड बाय ‘तन्वीशता’ आणि ‘वास्तु रविराज’ तर ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ आणि ‘श्री नेमिनाथ ज्वेलर्स’ हे फेस्टिव्हलचे गोल्ड पार्टनर तसेच ‘सावंत ज्वेलर्स’ आणि ‘सौभाग्य ज्वेलर्स’ हे सिल्व्हर पार्टनर आहेत. तर हेल्थ पार्टनर म्हणून ‘ब्रह्मविद्या साधक संघ’ याशिवाय, ‘अपना बाजार’, ‘राणेज पैठणी’, ‘देसाई बंधू आंबेवाले’, ‘मीलन लाइफस्टाइल्स’, ‘पर्शिया दरबार’ आणि ‘अजय अरविंदभाई खत्री’ हे या फेस्टिव्हलचे गिफ्ट पार्टनर आहेत.

ऋजुता देशमुखला भेटण्याची संधी

‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिवल’अंतर्गत अभिनेत्री ऋजुता देशमुख बोरिवली पूर्वेकडील शांतीवन येथील एम के घारे ज्वेलर्स या दुकानाला मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता भेट देणार आहे.

 

३० ते ३१ मार्च या कालावधीतील विजेते

*  राजेश महाजन – दादर – सोन्याचे नाणे आणि राणेज पैठणीचे गिफ्ट व्हावचर्स

*  संतोष सैदाम – बदलापूर – राणेज पैठणी आणि देसाई बंधू गिफ्ट व्हावचर्स

*  संजय वासवाणी – प्रभादेवी – मिलन लाइफस्टाइल आणि राणेज पैठणीचे गिफ्ट व्हावचर्स

*  राजश्री साळवी – मुलुंड – राणेज पैठणी आणि अपना बाजार गिफ्ट व्हावचर्स

*  क्षितिज घुगे – आंबोली – राणेज पैठणी आणि पर्शिया दरबारचे गिफ्ट व्हावचर्स

*  शांताराम सावंत – मुलुंड – देसाई बंधू आणि अपना बाजारचे गिफ्ट व्हावचर्स

*  आयुश्री डोईफोडे – कुर्ला – राणेज पैठणी आणि पर्शिया दरबारचे गिफ्ट व्हावचर्स

*  शैलेश कदम – कुर्ला – सोन्याचे नाणे आणि अपना बाजारचे गिफ्ट व्हावचर्स

*  मनाली आंबेकर – दादर – पर्शिया दरबार आणि राणेज पैठणी गिफ्ट व्हावचर्स

*  पुरुषोत्तम काळे – गिरगाव – मिलन लाइफस्टाइल आणि राणेज पैठणीचे गिफ्ट व्हावचर्स

*  मनिष पटेल – मालाड – चांदीचे नाणे व राणेज पैठणी गिफ्ट व्हावचर्स

*  गजानन इंगळे – प्रभादेवी – राणेज पैठणी, अपना बाजार गिफ्ट व्हावचर्स

*  मनोज – जोगेश्वरी – देसाई बंधू आणि अपना बाजार गिफ्ट व्हावचर्स

*  जे.आर.देसाई – शिवाजी पार्क – अपना बाजार आणि राणेज पैठणी गिफ्ट व्हावचर्स

आठवडय़ाचे विजेते

*  सुनील कडवट – मुंबई – अजय अरविंद आणि पर्शिया दरबार गिफ्ट व्हावचर्स

*  तेजस सनस – गिरगाव – सोन्याचे नाणे, राणेज पैठणी आणि मिलन लाईफस्टाईल गिफ्ट व्हावचर्स

*  कल्पना शिरसाट – अंधेरी – चांदीचे नाणे, देसाई बंधू आणि राणेज पैठणी गिफ्ट व्हावचर्स