28 September 2020

News Flash

परदेशातून ५७ हजार प्रवासी मुंबईत दाखल

वंदेभारत  अभियानांतर्गत गेल्या तीन महिन्यांत ४१९ विमानांमधून ५७ हजार ३६२ प्रवासी मुंबई दाखल

संग्रहित छायाचित्र

करोनामुळे वेगवेगळ्या देशांत अडकू न पडलेले ५७ हजार प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत.  गेल्या तीन महिन्यांतील ही आकडेवारी असून, ३१ ऑगस्टपर्यंत  परदेशातून आणखी मोठय़ा संख्येने प्रवासी येणे अपेक्षित आहे. वंदेभारत  अभियानांतर्गत गेल्या तीन महिन्यांत ४१९ विमानांमधून ५७ हजार ३६२ प्रवासी मुंबई दाखल झाले. त्यात मुंबईतील प्रवाशांची संख्या १९ हजार ३८३ आहे. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या १९ हजार ५७० आणि इतर राज्यांतील प्रवाशांची संख्या १८ हजार ४०९ इतकी आहे.

व्यायाम करताना मुखपट्टीचा वापर नको

मुंबई : व्यायामशाळेत किंवा योग संस्थेमध्ये व्यायाम, योगसाधना करताना मुखपट्टीचा वापर न करता चेहरा झाकला जाईल अशा फेसशील्ड किंवा अन्य साधनांचा वापर करण्याची सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली आहे.

देशात टाळेबंदीचे नियम शिथिल झाले असून ५ ऑगस्टपासून योग आणि व्यायामशाळा  सुरू करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात मात्र यासाठी अद्याप परवानगी दिलेली नाही.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 12:24 am

Web Title: 57000 migrants from abroad arrive in mumbai abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 अतिरिक्त साखरेच्या संकटावर इथेनॉल हाच उपाय – नाईकनवरे
2 मुंबई पूर्वपदाच्या दिशेने..
3 ‘साथरोग उपचारांसाठी राज्यभरात रुग्णालये’
Just Now!
X