लो मुंबईत शुक्रवारी ५७४ नव्या रुग्णांची नोंद झाली असून आठ रुग्णांचा मृत्यू झाला, तर ७९३ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

सध्या ७१०४ रुग्ण उपचाराधीन असून गंभीर रुग्णांच्या संख्येतही घसरण झाली आहे. मुंबईतील एकूण बाधितांची संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे.

मुंबईतील करोनाची स्थिती नियंत्रणात असून रुग्ण वाढीचा सरासरी दर ०.२१ टक्कय़ांवर स्थिर आहे. आतापर्यंत २ लाख ८२ हजाराहून अधिक म्हणजेच ९३ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. रुग्ण दुपटीचा सरासरी कालावधी तब्बल ३८२ दिवसांपर्यंत म्हणजेच एक वर्षांहून जास्त झाला आहे.

मुंबईत दररोज सरासरी १५ हजार चाचण्या केल्या जात आहेत. त्यापैकी ५ टक्के अहवाल बाधित येत आहेत. आतापर्यंत २५ लाख ६५ हजाराहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. करोनामुळे दगावलेल्यांची एकूण संख्या ११,२२७ झाली आहे.

ठाणे जिल्ह्य़ात २९७ जण बाधित

ठाणे जिल्ह्य़ात शुक्रवारी २९७ नवे करोनारुग्ण आढळून आले. तर सहा जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. जिल्ह्य़ात २ लाख ४८ हजार ८०९ करोनाबाधित रुग्ण झाले असून ६ हजार ४९ इतकी मृतांची संख्या झाली आहे. जिल्ह्य़ातील २९७ करोनाबाधित रुग्णांपैकी कल्याण डोंबिवलीतील ८४, ठाण्यात ७४, नवी मुंबई ६६, मीरा भाईंदर २०, बदलापूर १९, ठाणे ग्रामीण क्षेत्रातील १५, उल्हासनगर ९, अंबरनाथ ९ आणि भिवंडीतील एका रुग्णाचा सामावेश आहे.