24 September 2020

News Flash

५८८महाविद्यालयांची मान्यता धोक्यात

अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने देशातील ५८८ तंत्र शिक्षण महाविद्यालयांना ‘तुमच्या महाविद्यालयांमधील अभ्यासक्रमांची मान्यता रद्द का करू नये’ अशा नोटिसा बजाविल्या असून यामध्ये महाराष्ट्रातील ८८

| April 12, 2015 04:29 am

अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने देशातील ५८८ तंत्र शिक्षण महाविद्यालयांना ‘तुमच्या महाविद्यालयांमधील अभ्यासक्रमांची मान्यता रद्द का करू नये’ अशा नोटिसा बजाविल्या असून यामध्ये महाराष्ट्रातील ८८ महाविद्यालयांचा समावेश आहे. गंभीर गोष्ट म्हणजे उत्तर प्रदेशपाठोपाठ मान्यता रद्द करण्याच्या नोटिसा बजाविण्यात आलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे.
न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलेल्या मुंबई व नवी मुंबईतील २९ महाविद्यालयांतील पायाभूत सुविधांची पाहणी एआयसीटीईच्या विशेष चौकशी समितीने नुकतीच केली होती. देशभरातील सर्व तंत्र शिक्षण महाविद्यालयांना दरवर्षी एआयसीटीईकडे आगामी वर्षांच्या प्रवेश मान्यतेसाठी अर्ज करावा लागतो. यासाठीच्या पोर्टलवर संबंधित महाविद्यालयाची सर्व माहिती भरावी लागत असून एआयसीटीईची वरिष्ठ समिती त्याची छाननी करून संबंधित महाविद्यालयांची मान्यता निश्चित करीत असते. गेली अनेक वर्षे हा खेळ सुरू असून गेल्या काही वर्षांत ज्या महाविद्यालयांना मान्यता रद्द करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या त्यांनी आपल्या त्रुटी दूर केल्या का, याची माहिती मात्र एआयसीटीई आपल्या वेबसाइटवर देत नसल्याचे सिटिझन फोरमचे प्राध्यापक वैभव नरवडे यांनी सांगितले.
राज्यात ज्या ८८ महाविद्यालयांना नोटिसा देण्यात आल्या आहेत त्यांच्यामध्ये गेल्या वर्षी नोटिसा दिलेली किती महाविद्यालये होती, की ही सर्व नवीन महाविद्यालये आहेत, याचे कोणतेही स्पष्टीकरण एआयसीटीईने दिले नसल्याचे वैभव नरवडे यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्येही अध्यापकांची अनेक पदे रिक्त आहेत, तर खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये एकाच जागेत अनेक अभ्यासक्रम चालविणे, अपुरी जागा, पायाभूत सुविधा नसणे तसेच पदांबाबत खोटी माहिती देणे, अशा अनेक घटनांबाबत सिटिझन फोरमने वेळोवेळी एआयसीटीई तसेच राज्य तंत्र शिक्षण संचालनालयाकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. डीटीई व एआयसीटीईनेच केलेल्या चौकशीतही राज्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्यानंतरही एआयसीईटी दरवर्षी केवळ नोटिसा देण्याचा देखावा करीत असल्याचे प्राध्यापक सदानंद शेळगावकर यांनी सांगितले. खरे तर एआयसीटीईच्याच कारभाराची चौकशी करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

*देशभरातील अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक, फार्मसी, तसेच व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या बहुतेक महाविद्यालयांमध्ये पायाभूत सुविधा नसणे, अध्यापकांची पदे रिक्त असणे, तसेच शैक्षणिक कामगिरी सुमार असल्यामुळे या तंत्र शिक्षण महाविद्यालयांना आगामी मान्यता रद्द करण्याबाबतच्या नोटिसा बजाविल्या आहेत.
*या सर्व महाविद्यालयांना १५ एप्रिल रोजी दिल्ली येथील एआयसीटीई कार्यालयात बाजू मांडता  येणार आहे.
*उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र केलेल्या मुंबई व नवी मुंबईतील २९ अभियांत्रिकी महाविद्यालयांनाही बाजू मांडण्यासाठी १६ एप्रिल रोजी बोलाविण्यात आल्याचे एआयसीटीई  सूत्रांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2015 4:29 am

Web Title: 588 colleges grant in danger
Next Stories
1 राष्ट्रीय महामार्गावरही टोलमुक्ती ?
2 नांदेडमध्ये शौचालय क्रांती!
3 ग्रंथपालांची सरकारच्या विरोधात अवमान याचिका
Just Now!
X