News Flash

तीन तासात आढळले सहा नवे रुग्ण, महाराष्ट्रात आता १२२ करोनाग्रस्त

सहा नवे रुग्ण आढळल्याने करोनाग्रस्तांची संख्या वाढली

तीन तासात आढळले सहा नवे रुग्ण, महाराष्ट्रात आता १२२ करोनाग्रस्त
छायाचित्र-गणेश शिर्सेकर

राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या १२२ वर पोहचली आहे. मुंबई पाच तर ठाण्यात १ रुग्ण  आढळल्याने ११६ वरुन ही संख्या १२२ वर गेली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. तीन तासात ६ नवे रुग्ण आढळल्याने महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या १२२ वर पोहचली आहे.

सोमवारपर्यंत महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या ९७ वर होती. मंगळवारी सकाळी ४ नवे रुग्ण आढळल्याने ती १०१ वर पोहचली. त्यानंतर संध्याकाळपर्यंत ही संख्या १०७ वर पोहचली. आता नऊ नवे रुग्ण आढळल्याने ही संख्या ११६ झाली. त्यानंतर सहा नवे रुग्ण आढळले आहेत ज्यामुळे ही संख्या १२२ वर पोहचली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंता वाढवणारीच ही बातमी आहे. तरीही घाबरुन जाऊ नका आणि स्वयंशिस्त पाळा असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

आणखी वाचा- आपल्या वर्तमान काळावरच भविष्य अवलंबून : मुख्यमंत्री

दरम्यान आजच उद्धव ठाकरे यांनीही जनतेला हेच आवाहन केलं की घराबाहेर पडू नका. स्वतःला सांभाळा. मिळालेला वेळ हा कुटुंबीयांसोबत घालवा. लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा थांबणार नाहीत हेदेखील त्यांनी स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2020 5:14 pm

Web Title: 6 new coronavirus positive cases have been reported in the state today 5 in mumbai and 1 in thane state rise 122 scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 CoronaVirus : शेतकऱ्यांचा प्रश्न समजून घ्या; रोहित पवार यांची मुख्यमंत्र्यांना विनंती
2 Coronavirus: तुम्ही घरी काय करता?; या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे मिसेस मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत म्हणाले…
3 Coronavirus: लॉकडाऊनमुळे स्थलांतरित कामगारांचा घराकडे पायी प्रवास
Just Now!
X