News Flash

राज्य प्रशासनात मोठी उलथापालथ

तब्बल ६० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

तब्बल ६० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; अश्विनी जोशी उत्पादन शुल्क विभागात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रशासनात मोठे फेरबदल करताना तब्बल ६० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुंबईच्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांची उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त म्हणून, एस. श्रीनिवास यांची धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणात, चंद्रकांत दळवी यांची पुणे विभागीय आयुक्तपदी, तर बेस्टचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांची सहकार आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक वल्सा नायर यांची उत्पादन शुल्क  सचिव पदी बदली करण्यात आली आहे. नाशिक विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांची जलसंधारण व रोहयोचे सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. तर पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त महेश झगडे यांची नाशिक विभागीय आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. पुणे विकास प्राधिकरणाच्या आयुक्तपदी किरण गीते, अमरावती जिल्हाधिकारीपदी अभिजित बांगर, तर पालघर जिल्हाधिकारीपदी प्रशांत नारनवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गोविंद राज यांची पर्यटन विकास महामंडळात बदली करण्यात आली आहे. साखर आयुक्त बिपीन शर्मा यांची कौशल्य विकास आयुक्तपदी, तर कडू पाटील यांची साखर आयुक्तपदी, पुणे विभागीय आयुक्त एस. चोकलिंगम यांची जमाबंदी आयुक्तपदी, तर चंद्रकांत दळवी यांची पुणे विभागीय आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. सहकार आयुक्त म्हणून जगदीश पाटील यांची, तर सुरेंद्र बागडे यांची बेस्टचे महाव्यवस्थापक म्हणून बदली करण्यात आली आहे. श्रावण हर्डिकर यांची पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदी, नागपूर महापालिका आयुक्तपदी सातारा जिल्हाधिकारी अश्विन मदगल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विजय झाडे यांची क्रीडा आयुक्तपदी, तर राजाराम माने यांची ‘मेढा’चे महासंचालक म्हणून बदली करण्यात आली आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी शितल उगले यांची सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून औरंगाबादला बदली करण्यात आली असून तेथील सुनिल केंद्रेकर यांची महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे.  औरंगाबादचे जिल्हाधिकारी निधी पांडे यांची राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सुरेश काकणे यांची विमानतळ विकास प्राधिकरणाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून, अविनाश ढाकणे यांची सोलापूर महापालिका आयुक्तपदी, शिधावाटप नियंत्रकपदी दिलीप शिंदे यांची बदली करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2017 1:34 am

Web Title: 60 ias officers transfers in maharashtra
Next Stories
1 बांधकाम सुरू न करता विकासकाला ३० टक्के रक्कम
2 ‘राजकारण आणि संरक्षण दलात समन्वय हवा’
3 दारूबंदीवरून महाराष्ट्राचे उलटे पाऊल
Just Now!
X