News Flash

मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात करोना बाधित रुग्णाची आत्महत्या

६० वर्षांच्या रुग्णाने आत्महत्या केली

संग्रहित छायाचित्र

मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात एका करोना बाधित रुग्णाने आत्महत्या केली आहे. रुग्णालयाच्या नवव्या मजल्यावर या रुग्णावर उपचार सुरु होते. या रुग्णाला करोनासह इतरही आजार होते. या रुग्णाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या १९ हजारांच्याही पुढे गेली आहे. तर मुंबईतल्या करोना रुग्णांची संख्या ही ११ हजारांच्याही वर गेली आहे. अशात आता एका ६० वर्षांच्या रुग्णाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. फ्री प्रेस जरनलने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 8:47 pm

Web Title: 60 year old covid 19 patient commits suicide at seven hills hospital in mumbai scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रं हाती घेताच इकबाल चहल धारावीत
2 “केंद्र सरकार रेल्वे देण्यास तयार, कामगारांना पायी जाण्यापासून रोखा”, फडणवीसांची राज्य सरकारला विनंती
3 धक्कादायक! मुंबईत तरुणाचा पोलिसांवर कोयत्याने हल्ला, पाठलाग करत फिल्मी स्टाइलने अटक
Just Now!
X