News Flash

मुंबईत करोनामुळे सहा हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू

रुग्णसंख्या पोहोचली एक लाख ७९८१ वर

(संग्रहित छायाचित्र)

राज्यात करोनाचं थैमान सुरूच असून, अनेक शहरांमध्ये प्रसारावर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला करोनानं वेढा टाकला असून, मुंबईचं अर्थचक्रच ठप्प झालं आहे. दुसरीकडे मुंबईतील रुग्णसंख्येचा आकडा लाखाच्या पुढे गेला असून, आतापर्यंत सहा हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा करोनानं बळी घेतला आहे.

मुंबईत आतापर्यंत चार लाख ७० हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यांपैकी २३ टक्के रुग्ण बाधित आढळले आहेत. तर मुंबईतील रुग्णवाढीचा सरासरी दर १.०६ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही ६६ दिवसांवर पोहोचला आहे. शनिवारी दिवसभरात मुंबईत १,०९० बाधितांची नोंद झाली, तर ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील करोनामुक्त रुग्णांचा आकडा वाढत असला तरी मृत्युदर अद्याप खाली आलेला नाही. मुंबईत आतापर्यंत ६०३३ जणांचा मृत्यू झाला असून, मृत्युदर सध्या ५.५ टक्के इतका आहे.

सकारात्मक दिलासा..

मुंबईतील ७३ टक्के रुग्ण आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत. राज्याच्या टक्केवारीपेक्षा हे प्रमाण जास्त आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५७ टक्के आहे. एकूण बाधितांचा आकडा १ लाख ७ हजार ९८१ इतका आहे. शनिवारी ६१७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत ७८,८७७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, तर १,१९७ रुग्णांची स्थिती गंभीर आहे.

ठाणे जिल्ह्यात आढळले मुंबईपेक्षा जास्त रुग्ण

ठाणे जिल्ह्यात शनिवारी १ हजार ६४९ नवे करोना रुग्ण आढळून आले असून, एकूण रुग्णसंख्या ७७ हजार ९५ वर पोहोचली आहे. दिवसभरात ४० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या २ हजार ११५ इतकी झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2020 9:04 am

Web Title: 6033 people died in mumbai after infection of coronavirus bmh 90
Next Stories
1 मराठी किशोर वाङ्मयात ‘नव्या’ नायकांचा दुष्काळ
2 अभ्यासक्रमाला कात्री!
3 लोकसत्ताच्या ‘एकमेव लोकमान्य’चे १ ऑगस्टला प्रकाशन
Just Now!
X