मुंबईत सध्या १२,२७४ रुग्ण उपचाराधीन असून, त्यापैकी ७४ टक्के रुग्ण लक्षणे विरहित आहेत. तर केवळ २६ टक्के म्हणजे सुमारे २,२०० रुग्णांना लक्षणे आहेत. शुक्रवारी ६५४ करोनाबाधित आढळले, तर ११ जणांचा मृत्यू झाला. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी सरासरी ३०५ दिवसांवर गेला आहे. दैनंदिन रुग्णांपैकी ८० टक्क्य़ांहून अधिक रुग्ण लक्षणे विरहित आढळू लागले आहेत. एकूण उपचाराधीन रुग्णांपैकी ७४ टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत.

ठाणे जिल्ह्य़ात ११ जणांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्य़ात शुक्रवारी ४८६ करोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या २ लाख ३५ हजार ३६१ वर पोहोचली आहे. दिवसभरात ११ जणांचा मृत्यू झाल्याने करोनाबळींची संख्या ५ हजार ८०१ इतकी झाली आहे. शुक्रवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये ठाणे शहरातील १४६, कल्याण-डोंबिवली १०४ जणांचा सामावेश आहे.