सीमा शुल्क विभागाने मुंबई विमानतळावरून तीन वेगवेगळ्या प्रकरणात तब्बल ६७ लाख रुपयांचे सोने जप्त केले आहे. सोमवार आणि मंगळवारी दुबईहून आलेल्या तीन प्रवाशांकडून हे सोने जप्त करण्यात आले. अटक केलेल्या तिन्ही प्रवाशांचा एकमेकांशी काही संबंध आहे का त्याचा तपास पोलीस करत आहेत.
पहिल्या प्रकरणात जेट एअरवेजने (९ डब्ल्यू ५३७) आलेल्या मोदी उमर शहा (४५) याला ताब्यात घेण्यात आले. तो दुबईहून मुंबईत आला होता. त्याच्याकडून २२ लाख रुपये किंमतीचे ९३२ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. दुसऱ्या प्रकरणात जामनगरच्या सुरानी इम्तियाज शेख (२२) याला हवाई गुप्तचर विभागाने ताब्यात घेतले. त्याने दूरचित्रवाणी संचात २२ लाखांचे सोने दडवून आणले होते. तो दुबईहून आला होता. तर तिसऱ्या प्रकरणातह समशीन थ्थयुलाठी (३२) याला १ किलो सोन्याच्या तस्करीप्रकरणी अटक करण्यात आली.