News Flash

मुंबईत वृद्धेला करोनाचा संसर्ग

सध्या कस्तुरबामध्ये १६ करोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.

मुंबई : मुंबईत ६८ वर्षीय महिलेला करोनाचा संसर्ग झाल्याचे बुधवारी उघडकीस आले. अमेरिकेतून परतलेल्या ४९ वर्षीय पुरुषाच्या घरी ही महिला काम करत असून थेट संपर्कात आल्याने तिला संसर्ग झाला आहे. तिने कोणताही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही. ४९ वर्षांचा पुरुष ७ मार्च रोजी अमेरिके तून परतल्यानंतर १६ मार्चला त्याला लक्षणे जाणवल्याने त्याने कस्तुरबा रुग्णालयात तपासणी के ली. करोनाचा संसर्ग झाल्याचे मंगळवारी स्पष्ट झाल्यानंतर त्याच्या घरात काम करणाऱ्या ६८ वर्षीय महिलेची तातडीने तपासणी करण्यात आली. याचा अहवाल बुधवारी आला असून तिलाही संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या कस्तुरबामध्ये १६ करोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.

करोना नियंत्रणासाठीच्या खर्चास आर्थिक र्निबधातून सूट

मुंबई : ‘करोना’ ला तोंड देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या औषधे, उपकरणे, यंत्रसामुग्री व इतर साहित्य व सेवांसाठीच्या खर्चास आर्थिक र्निबधातून सूट देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे. त्याबाबतचे प्रस्ताव  वित्त विभागाकडे मान्यतेसाठी पाठवण्याची गरज नाही, असेही  स्पष्ट करण्यात आले. आर्थिक वर्षांच्या अखेरीस अनावश्यक अथवा प्राधान्यक्रम नसणाऱ्या बाबींवरील खर्च निर्धारित व नियमित करण्यासाठी काही बाबींवरच्या प्रस्तावांवर निर्बंध घालण्यात येतात. त्यानुसार १ फेब्रुवारी २०२० नंतर अशा बाबींच्या खरेदीस मान्यता देण्यात येत नाही. मात्र औषध खरेदीवरील बाबींना यामध्ये अपवाद करण्यात आला आहे. तसेच राज्यातील ‘करोना नियंत्रणासाठी आवश्यक असणाऱ्या औषधे, उपकरणे, यंत्रसामुग्री तसेच तत्सम साहित्य व सेवा यांवरील खर्चास या र्निबधातून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरात प्रशासनाला वेगाने काम करणे शक्य होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 12:09 am

Web Title: 68 year old woman diagnosed with coronavirus infection in mumbai zws 70
Next Stories
1 न्या. भूषण धर्माधिकारी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती
2 मुंबई उद्यापासून अंशत: लॉकडाऊन, ठाकरे सरकारने घेतले हे महत्वाचे निर्णय
3 देऊळ बंद.. पण सिद्धीविनायकाचं आता घेता येणार ऑनलाइन दर्शन
Just Now!
X