घटस्फोटीत महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्या जवळ असलेल्या पैशांचा अपहर करून त्यांना गंडा घालणाऱ्या तोतया हॉटेल व्यावसायिकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या चौकशीत टार्गेट केलेल्या सात हायप्रोफाईल महिलांना १४ लाखांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांच्या माहितीनुसार, स्त्रीलंपट लाखोबाचे नाव महेश अशोक कुलकर्णी (वय ३८) असे असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. कॉमर्स पदवीधर असलेला महेश कुलकर्णी हा लग्न जुळविणाऱ्या हायप्रोफाईल विवाह सूचक संकेतस्थळावर असलेल्या महिलांना लग्नाचे आमिष दाखवायचा, आपला हॉटेल व्यवसाय असल्याचे भासवून महिलांकडे असलेल्या पैशाचा अपहर करून त्यांना गंडा घालायचा. आतापर्यंत त्याने ७ पेक्षा अधिक महिलांना फसविल्याचे समोर आले असून त्यांच्याकडून १४ लाख रुपये उकळले आहेत.

या भामट्याने मुंबईसह कल्याण, विरार, पुणे, गोवा, बंगळूरु शहरातील अनेक घटस्फोटीत महिलांना सावज केले. जुहू येथील हरे राम हरे कृष्ण मंदिराजवळ राहत असलेला हा भामटा महेश कुलकर्णी भाड्याच्या घरात राहत होता. काही दिवसांपूर्वी त्याने बंगळुरू येथील एका कापड व्यावसायिक महिलेशी ओळख केली. ओळखीनंतर तिचा विश्वास संपादन करून कुलकर्णीने आपण हॉटेल व्यावसयिक असल्याचे तिला खोटे सांगितले. तसेच आपल्याला कामानिमित्त सतत विमान प्रवास करावा लागतो असेही त्याने तिला सांगितले. आपल्याकडे प्रवासासाठी कार नसल्याचे सांगत महेश कुलकर्णीने त्या कापड व्यावसायिक महिलेकडून तिची एकस्युव्ही कर घेतली. कार ताब्यात येताच त्याने संबंधीत महिलेशी संपर्क तोडला. मात्र, आपली कार मुंबईत आल्याची माहिती मिळताच महिलेने पोलिसांत धाव घेतली.

फसवणूक झालेली संबंधीत महिला गोवा येथे राहते. या भामट्याने गोव्यातील अन्य एका महिलेला यापूर्वी गंडा घातला होता. तिनेही ई-मेलवरून एअरपोर्ट पोलिसांकडे तक्रार नोंदविली होती. या महिलेशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करून त्याने आपले गोव्यात हॉटेल असल्याचे तिला खोटे सांगितले होते. त्यानंतर विविध कारणे सांगून या महिलेकडून त्याने ८ लाख रुपये उकळले होते. त्यानंतर महिलेला संशय आल्याने तिने महेश कुलकर्णीची पडताळणी केल्यानंतर त्याने सांगितलेली माहिती खोटी असल्याचे उघड झाले. त्यानंतर महिलेने एअरपोर्ट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी महेश कुलकर्णी विरोधात सुमोटो दाखल करून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी सापळा रचला. दरम्यान महेशने बंगळुरु येथील एका महिलेला त्याच्याबाबत काही टिप्स दिल्या. त्यानंतर महिलेने त्याच्याशी संपर्क केला. हॉटेलमध्ये गुंतवणूक करण्याचा मानस व्यक्त केला. त्यानंतर सावज टार्गेटमध्ये आल्याच्या आनंदात महेश कुलकर्णी हा एअरपोर्ट जवळील पार्कींग येथे भेटण्यासाठी आला. त्याचवेळी पोलिसांनी त्याला रंगेहाथ अटक केली. त्यानंतर त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने ७ पेक्षा जास्त महिलांना चुना लावीत तब्बल १४ लाख रुपये उकळल्याची माहिती समोर आली. त्याला न्यायालयात नेले असता शनिवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 7 divorced women looted 14 lakhs for marriage decoy detected hotel professional suspects
First published on: 15-11-2018 at 00:45 IST