News Flash

नालासोपाऱ्यात भीषण स्फोट, सात जण जखमी

नालासोपारा पूर्वेला एमडी नगरमधील महालक्ष्मी अपार्टमेंट या रहिवाशी इमारतीतील एका घरामध्ये शनिवारी सकाळी स्फोट झाला.

| November 15, 2014 04:34 am

नालासोपारा पूर्वेला एमडी नगरमधील महालक्ष्मी अपार्टमेंट या रहिवाशी इमारतीतील एका घरामध्ये शनिवारी सकाळी स्फोट झाला. या स्फोटात सात ते आठ जण जखमी झाले असून, एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
नालासोपारा पुर्व एम.डी. नगर येथील महालक्ष्मी आपार्टमेंट मधील बि विंगच्या तळमजल्यावर सकाळी साडे नऊ वाजता हा स्फोट झाला. अचानक झालेल्या स्फोटात महालक्ष्मी अपार्टमेंट मधील तळमजल्यावरील सात ते आठ घरांच्या काचा, दार, खिडक्या तुटून पडल्या. स्फोटाचे नेमके कारण समजलेले नसले तरीही घरात गॅस गळती झाल्यामुळे स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.  स्फोटामुळे घरातील अनेकांना गंभीर जखमा झाल्या आहेत. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी अधिक चौकशी सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2014 4:34 am

Web Title: 7 injured in blast at mahalakshmi apartment b wing
टॅग : Blast,Mumbai News
Next Stories
1 मुख्यमंत्र्यांची ‘स्वच्छता’ मोहीम!
2 मराठा मागास नाहीत!
3 शटलमुळे विलंब अटळ!
Just Now!
X