१२० पैकी ७० बस सेवेत, वाढीव प्रवाशांना दिलासा नाहीच

मुंबई : शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा बहुतांश भार वाहणाऱ्या बेस्टच्या ताफ्यातील सुमारे १२० पैकी ७० दुमजली (डबलडेकर) बसगाडय़ाच सध्या रस्त्यावर धावत आहेत. गर्दीनुसार काही मार्गावर या बसचे नियोजन के ले जात असून आतापर्यंत के वळ चार नव्या मार्गावरच त्या सुरू करण्यात आल्या आहेत.

साध्या एकमजली बसमध्ये बसून आणि उभ्याने ७० प्रवासी प्रवास करू शकतात. दुमजली बसमधून ९० प्रवासी प्रवास करू शकतात. शारीरिक अंतरनियमांचे पालन करण्याबरोबरच अधिकाधिक प्रवासी नेण्याकरिता दुमजली बसगाडय़ा उपयोगी ठरल्या असत्या. मात्र बेस्टमधील या गाडय़ांचा ताफा अनेक कारणांमुळे कमी झाला आहे. ज्या आहेत त्याही पूर्ण क्षमतेने चालविल्या जात नाहीत.अंतरनियमामुळे १६ लाख प्रवाशांचा भार सोसताना बेस्टच्या नाकीनऊ येत आहेत. अत्यावश्यक सेवेबरोबरच खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा भार बेस्टवरच असल्याने अनेक ठिकाणी अंतरनियम धुडकावून वाहतूक होते. यावर उपाय म्हणून विक्र ोळी ते बॅकबे, दादर ते इलेक्ट्रिक हाऊस, सायन ते मुलुंड, कलानगर ते दिंडोशी या गर्दीच्या मार्गावर नव्याने दुमजली बस सुरू करण्यात आल्याची माहिती बेस्ट उपक्र माने दिली. तर बस क्र मांक ३१० कु र्ला स्थानक ते वांद्रे स्थानक, बस क्र मांक ३३२ कु र्ला ते अंधेरी पूर्व, बस क्र मांक ४१५ अंधेरी पूर्व ते सांताक्र ुझ या मार्गावर टाळेबंदीआधी सुरू असलेल्या बसफे ऱ्या टाळेबंदीनंतरही सुरूच आहेत.

या मार्गावर साधारण ७० दुमजली बस धावत आहेत. मात्र बस क्र मांक ३१३ सांताक्र ुझ ते कु र्ला, बस क्र मांक १३८ सीएसएमटी ते बॅकबे यासह अन्य काही मार्गावर याआधी धावत असलेल्या दुमजली बसची सेवा सुरू झालेली नाही. प्रवासी संख्या कमी असल्याने या मार्गावर एकमजली साध्या बस चालविण्यात येत असल्याची माहिती बेस्ट उपक्र माकडून देण्यात आली.

गर्दीनुसार दुमजली बस नवीन मार्गावर चालवल्या जात आहेत. या बसगाडय़ांची संख्या कमी आहे. आणखी काही मार्गावर त्या चालवता येतील का ते तपासले जात आहे,  अशी माहिती बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी दिली. दुमजली गाडय़ा भंगारात काढण्याबाबत चर्चा सुरू आहे. पण, सध्यातरी दुमजली बस भंगारात काढण्याचा विचार नसल्याचे त्यांनी सांगितले. आयुर्मान पूर्णपणे संपल्यानंतर येत्या काळात टप्प्याटप्प्याने भंगारात काढल्या जातील. बेस्ट समितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

ताफा कमी

बेस्ट उपक्र माकडे एकू ण ३,५०० बस असून यामध्ये १२० दुमजली बसचा समावेश आहे. १५ वर्षांपूर्वी दुमजली बसचा ताफा ९०० पर्यंत होता. मुंबईतच नव्हे तर उपनगरातील मुलुंड, दहिसर तर अगदी सीबीडी बेलापूपर्यंत या बस धावत होत्या. मात्र मेट्रो, मोनो रेल सुरू झाल्या, तर काही ठिकाणी स्कायवॉक आले. त्यामुळे दुमजली बस चालविणे कठीण झाले. परिणामी बेस्टने या गाडय़ांची संख्या कमी के ली.