04 July 2020

News Flash

राज्यात ७० हजार परिचारिका काम करण्यास उत्सुक

पदभरतीची जाहिरात काढण्याची ‘डीएमईआर’कडे मागणी

पदभरतीची जाहिरात काढण्याची ‘डीएमईआर’कडे मागणी

मुंबई : राज्यात ७० हजार परिचारिका काम करण्यास उत्सुक असताना केरळमधून परिचारिंकांची मागणी करणाऱ्या वैद्यकीय शिक्षण विभागाविरोधात (डीएमईआर) निषेध नोंदवत परिचारिकांच्या संघटनांनी राज्यात पदभरतीची जाहिरात काढण्याची मागणी केली आहे.

मुंबई आणि पुणे शहरांमध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्याने १०० परिचारिका पुरवण्याची मागणी ‘डीएमईआर’ने केरळ सरकारकडे केली आहे. राज्यात २०१८ साली ५२८ जागांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने पदभरती जाहीर केली होती. यातील ३९९ पदे भरली असून उर्वरित १२९ परिचारिकांची कागदपत्रे पडताळणीपासून सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तेव्हा यांना तातडीने रुजू करू घेणे शक्य आहे. या व्यतिरिक्त या भरतीसाठी हजारो परिचारिकांनी अर्ज दाखल करून परीक्षा दिलेली होती. यातूनही काही परिचारिकांना कामावर बोलावता येईल. मात्र उपलब्ध मनुष्यबळाचा वापर न करता थेट केरळहून परिचारिका बोलावणे, हा आमच्यावर अन्याय असल्याचे महाराष्ट्र राज्य परिचर्या आणि आरोग्य कर्मचारी संघटनेने पत्राद्वारे व्यक्त केले आहे.

फेब्रुवारी २०१८ नंतर एकदाही परिचारिकांची जाहिरात आरोग्य विभागाने काढलेली नाही. राज्यात सध्या सुमारे ७० हजार नोंदणीकृत परिचारिका काम करण्यास उत्सुक असून या व्यतिरिक्त १५ हजार परिचारिकांनी परीक्षा दिलेली आहे. सध्य परिस्थितीत संपूर्ण कार्यपद्धती शक्य नसली तरी सहा महिन्याच्या कंत्राटी पद्धतीनेही या परिचारिका काम करण्यास तयार आहेत. मात्र याला डावलून अधिकचे वेतन देऊन परराज्यातील परिचारिकांना सरकारकडून प्राधान्य दिले जात आहे. ससून महाविद्यालय, सोलापूर रुग्णालयाने कंत्राटदारांकडून निविदा पद्धतीने परिचारिकांची भरती करून घेण्याची जाहिरात काढली आहे. परिचारिका हे पद इतर कामगारांप्रमाणे कंत्राटदारांकडून मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासारखे नाही. यातून पिळवणूक होण्याची शक्यता असल्याने सरकारने जाहिरात

दिल्यास हजारोंच्या संख्येने परिचारिका धावून येतील, असे संघटनेच्या समन्वयक सुमित्रा मोटे यांनी व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2020 3:19 am

Web Title: 70000 nurse eager to work in the maharashtra state zws 70
Next Stories
1 कैद्यांच्या जामीन-पॅरोल अर्जावर तातडीने निर्णय द्या
2 सरकारच्या धरसोड धोरणामुळे ‘पीओपी’ मूर्ती बंदी लांबणीवर
3 मृतदेह ताब्यात मिळण्यासाठी ५ दिसवसांची प्रतीक्षा
Just Now!
X