News Flash

विद्यार्थिनीचा अश्लील एमएमएस बनवणाऱ्या मदरशाच्या ७० वर्षीय विश्वस्तास अटक

एका १४ वर्षीय विद्यार्थीनीची अश्लील चित्रफित (एमएमएस) तयार करून तिच्याशी अनैसंर्गिक संबंध ठेवणाऱ्या एका ७० वर्षीय मदरशाच्या विश्वस्तास पोलिसांनी अटक केली आहे. नियाझ अहमद हसन

| January 11, 2013 04:52 am

एका १४ वर्षीय विद्यार्थीनीची अश्लील चित्रफित (एमएमएस) तयार करून तिच्याशी अनैसंर्गिक संबंध ठेवणाऱ्या एका ७० वर्षीय मदरशाच्या विश्वस्तास पोलिसांनी अटक केली आहे. नियाझ अहमद हसन रझा असे त्याचे नाव आहे. शिवाजीनगर येथे राहणारी ही विद्यार्थिनी रहेमानिया मदरशात शिकण्यासाठी जात असे. नियाज अहमद हसन रझा तेथे अरबी शिकवायचा. डिसेंबरमध्ये त्याने मुलीला धार्मिक कविता दाखविण्याच्या बहाण्याने बिलाल मशिदीत नेले व विनयभंग केला. यावेळी तिच्याशी अनैसर्गिक संबंध ठेवत अश्लील चित्रफितही तयार केली. रझा याचा मोबाईल दुरुस्तीसाठी दुकानात आल्यानंतर हा अश्लील एमएमएस बाहेर फुटला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2013 4:52 am

Web Title: 70years old trustee got arrest for creating bluefilm mms
Next Stories
1 ‘मनवासे’ची सर्व पदे बरखास्त
2 रेल्वेचा दुसरा धक्का
3 आमदारांना ‘संस्कृती शिकवण्यासाठी’ सरकारची उधळपट्टी
Just Now!
X