मुंबई : मुंबईत रस्ते अपघातांमध्ये २०१८ (जानेवारी ते ऑक्टोबर) आणि २०१९ मध्ये ४ हजार ९६७ अपघातांमध्ये ७१५ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अपघात व मृत्यूंचे प्रमाण पाहता त्यात घट झाल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली. ठाणे शहरातही ३९३ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

दारू पिऊन आणि बेदरकारपणे वाहन चालवणे, वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे इत्यादी कारणांमुळे रस्ते अपघातांचे प्रमाण वाढतच आहे. या अपघातांमध्ये फारशी घट झालेली दिसून येत नाही. ३० टक्के प्राणांतिक अपघात तर भरधाव वेगाने वाहन चालवल्यानेही होत आहेत. अपघात कमी करण्यासाठी विविध प्रकारे पोलिसांकडून जनजागृती केली जाते. मात्र त्याला फारसा प्रतिसाद वाहनचालकांकडून मिळत नसल्याने अपघातांची परिस्थिती जैसे थेच आहे.

* मुंबईत होणाऱ्या अपघातांमध्ये पादचाऱ्यांचाही समावेश अधिक आहे. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीत, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अपघातांत १० टक्क्यांची घट असून मृत्यूंचे प्रमाण १८ टक्क्यांनी आणि जखमींचे प्रमाण १२ टक्क्यांनी कमी झाले आहे.

मुंबई

२०१८ 

२,६१९ अपघात

३९३ मृत्यू

२,७५० जखमी

२०१९

२,३४८ अपघात

३२२ मृत्यू

२,५२८ जखमी

ठाणे

२०१८

८०८ अपघात

२१५ मृत्यू

८११ जखमी

२०१९

७३५ अपघात

१७८ मृत्यू

६७७ जखमी