News Flash

नवी मुंबईत करोनाचे नवे ७२ रुग्ण

आज करोनामुळे नवी मुंबईत तीन जणांचा मृत्यू

(संग्रहित छायाचित्र)

 

नवी मुंबई-नवी  मुंबई महापालिका क्षेत्रात करोनाबाधितांची संख्या ४५ हजारांच्या पुढे गेली आहे. शहरात आजपर्यंत एकूण ९२१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.तर दुसरीकडे शहरात करोनामुक्तीचा दर ९४ टक्के झाला आहे. शहरात  एकूण ४५,३६० करोनाबधित झाले आहेत. आज शहरात ७२ नवे करोनाबधित रुग्ण आढळले आहेत.

नवी मुंबईत  करोनाबाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. वाढत्या संसर्गामुळे शहरात करोनाबाधितांची  एकूण संख्या ४५ हजार ३६० झाली आहे. तर शहरात आज ३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून करोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ९२१ झाली आहे. शहरात आतापर्यंत एकूण २,९८,४१०जणांच्या चाचण्या  करण्यात आल्या असून करोनामुक्तीचा दर  वाढला आहे. तर शहरातील मृत्यूदरही कमी  आहे.आज शहरात १८५ जन करोनामुक्त झाले असून आतापर्यंत  एकूण ४३,०४० जन करोनामुक्त झाले आहेत.तर शहरात १३९९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2020 9:40 pm

Web Title: 72 new corona cases in navi mumbai scj 81
Next Stories
1 केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची करोनावर मात
2 १९० कोटींच्या कंत्राटासाठी फेरनिविदा?
3 शिवाजी पार्क मैदानात सापांचा सुळसुळाट
Just Now!
X