News Flash

विलेपार्ले येथे वृद्ध महिलेची मुलीसह आत्महत्या

मीरा आणि मंजिरी या दोघी विलेपार्ले येथील महात्मा गांधी रस्त्यावरील परांजपे बंगल्यात राहत होत्या.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : विलेपार्लेतील परांजपे स्कीम येथील एका बंगल्यात राहणाऱ्या एक ७२ वर्षीय वृद्ध महिला आणि त्यांच्या मुलीने (वय ५३) गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मीरा परांजपे (७२) आणि मंजिरी परांजपे (५३) अशी या मायलेकीची नावे आहेत. आयुष्याला कंटाळून या दोघींनी आत्महत्या केल्याची शक्यत पोलिसांनी वर्तवली आहे.

मीरा आणि मंजिरी या दोघी विलेपार्ले येथील महात्मा गांधी रस्त्यावरील परांजपे बंगल्यात राहत होत्या. दोन वर्षांपूर्वी मीरा यांच्या पतीचे निधन झाले. मीरा यांचा मुलगा परदेशात वास्तव्याला आहे. पतीच्या निधनानंतर त्या दोघीच राहत होत्या. मंजिरी अविवाहित होत्या. तसेच त्या मानसिक आजारांनी ग्रस्त होत्या. मीरा यांच्याकडे कामाला असलेली महिला त्यांच्याच बंगल्यातील एका खोलीत राहत असे.

मंगळवारी नेहमीप्रमाणे सकाळी उठल्यावर तिने मीरा यांना उठविण्यासाठी त्यांच्या खोलीचे दार ठोठावले. मात्र बराच वेळ दार वाजवूनही आतून कुठलाच प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी मीरा यांच्या नातेवाईकांना ही बाब कळवली. मीरा यांचे काही नातेवाईक घरी आले. त्यांनीही दरवाजा उघडण्याच प्रयत्न केला. मात्र त्याचा काहीच उपयोग न झाल्याने त्यांनी पोलिसांना बोलावले.

पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने घराचा दरवाजा तोडला. त्यावेळी मीरा आणि मंजिरी या ओढणीने एकाच पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या. मीरा यांना आपल्या पश्चात मुलीच्या भवितव्याची चिंता भेडसावत असे. तर मंजिरी यांनाही आपले काही बरेवाईट झाल्यास आईची काळजी कोण घेईल, याची भीती वाटात असे.

आयुष्याला कंटाळूनच त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. मीरा यांच्याजवळ आत्महत्येपूर्वी लिहलेली कोणतीही चिठ्ठी आढळून आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 12:29 am

Web Title: 73 old woman commits suicide with daughter at vile parle zws 70
Next Stories
1 ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांची ४० टक्के पदे रिक्त
2 विद्यापीठाच्या गुणपत्रिकाही ऑनलाइन
3 नव्या नियुक्तीला विरोध; महिला आयोगाच्या अध्यक्षांनी दिलं सर्वोच्च न्यायालयात आव्हान
Just Now!
X