News Flash

मुंबईत ७४८ नवे रुग्ण

मृतांचा आकडा ४६२ वर

संग्रहित छायाचित्र

मुंबईत आणखी ७४८ आणखी करोनाग्रस्त सापडले असून रुग्णांचा आकडा ११,९६७ वर गेला आहे. गेल्या पाच दिवसात २८४४ रुग्ण वाढले आहेत. तर आज नव्याने २५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा ४६२ वर गेला आहे.

मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी दहा दिवसांचा असला तरी गेल्या अवघ्या पाच दिवसात २८४४ रुग्ण वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

शुक्रवारी मृत झालेल्या २५ रुग्णांपैकी १२ रुग्णांना अन्य कोणतेही आजार नव्हते. कोणताही आजार नसताना करोनाबळी होणाऱ्या रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे शुक्रवारी १५४ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत २५८९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

कीर्तिकर मार्केट मधील १५ जण करोनाग्रस्त

दादरच्या कीर्तिकर मार्केट मधील एका व्यक्तीला करोना झाल्यानंतर त्याच्या दुकानात झोपणाऱ्या कामगारांना रुपारेल महाविद्यालयात विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले होते. त्यातील १५ कामगारांचे अहवाल बाधित आले आहेत. त्यामुळे दादरमधील रुग्णांचा आकडा ८७ वर गेला आहे. आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला असून १७ जण करोनामुक्त झाले आहेत.

चेंबूरमध्ये दहा दिवस टाळेबंदी कठोर

चेंबूरमधील पी. एल. लोखंडे मार्गावरील झोपडपट्टी भागात करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने शुक्रवारपासून तेथे दहा दिवस पूर्णपणे टाळेबंदी करण्यात आली आहे. औषधांची दुकाने वगळता या ठिकाणी सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. १७ मेपर्यंत या परिसरातील औषधांची दुकाने वगळता सर्वकाही बंद असेल. चेंबूरमधील सर्वात मोठा झोपडपट्टी परिसर असलेल्या पी. एल. लोखंडे मार्ग भागात १२५ करोनाचे रुग्ण आढळून आले. त्यापैकी १० जणांचा मृत्यू झाला असून ३६ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 12:57 am

Web Title: 748 new patients in mumbai abn 97 2
टॅग : Coronavirus
Next Stories
1 शेकडो मजुरांची पायपीट
2 रेल्वेच्या ५६ कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग
3 वांद्रे जिमखान्याच्या अध्यक्षासह १५ जणांवर गुन्हा
Just Now!
X