21 September 2020

News Flash

मुंबईतील ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त

गेल्या २४ तासांत ४५ रुग्णांचा मृत्यू

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबईत शुक्रवारी ८६२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. एका दिवसांतील बाधितांचा आकडा आता कमी होऊ लागला आहे, तर ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. गेल्या २४ तासांत ४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईतील रुग्णवाढीचा दर एक टक्क्यांपेक्षा कमी म्हणजे ०.८२ टक्के एवढा झाला आहे. बोरिवली, नानाचौक-ग्रँटरोड, मस्जिद बंदर, डोंगरी या परिसरात मुंबईतील सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. या भागात रुग्णवाढीचा दर १.३ टक्के आहे.

शुक्रवारी ८६२ नवे रुग्ण आढळल्याने बाधितांची एकूण संख्या १ लाख २१ हजार २७ झाली आहे. तर एका दिवसात १२३६ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ९३,८९७ म्हणजेच ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, तर २०,१४३ रुग्ण उपचाराधीन आहेत.

शुक्रवारी ४५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मृतांमध्ये ३१ पुरुष व १४ महिला होत्या. २९ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते, तर ३३ रुग्णांचे वय ६० वर्षांवरील होते. आतापर्यंत ६६९० जणांचा मृत्यू झाला असून मृत्युदर ५.५ टक्के आहे.

३५ इमारती, नऊ परिसर निर्बंधमुक्त

मुंबई : मुंबईतील टाळेबंद इमारती व प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली असून सहा दिवसांमध्ये ३५ इमारतींमध्ये करोनाबाधित नवे रुग्ण न सापडल्याने त्या टाळेमुक्त, तर नऊ परिसर प्रतिबंधमुक्त करण्यात आले आहेत. पालिकेने १ ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या यादीत पाच हजार ५१९ टाळेबंद इमारतींचा, तर ६१७ प्रतिबंधित क्षेत्रांचा समावेश होता. प्रशासनाने ६ ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या सुधारित यादीनुसार पाच हजार ४८४ टाळेबंद इमारती असून ६०८ ठिकाणे प्रतिबंधित आहेत. त्यातील ३५ इमारती, तर ९ प्रतिबंधित क्षेत्रे वगळण्यात आली आहेत. बोरिवली परिसरात सर्वाधिक म्हणजे ७०८ इमारती टाळेबंद आहेत. अंधेरी पूर्व परिसरात ४९३, कांदिवलीमध्ये ४३१, मुलुंडमध्ये ३५२, दहिसरमध्ये ३२७, अंधेरी पश्चिममध्ये २८०, तर ग्रॅन्टरोड  व परिसरात  २६० इमारती टाळेबंद आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 1:03 am

Web Title: 77 of patients in mumbai are corona free abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 वकील तूर्त अत्यावश्यक सेवेत नाहीत!
2 ऑनलाइन वर्गाना प्राध्यापकांचा विरोध
3 तंत्रशिक्षण पदविका प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून
Just Now!
X