राज्यात बुधवारी उद्दिष्टाच्या ७७ टक्के करोना लसीकरणाची नोंद झाली. गडचिरोली जिल्ह्य़ात सर्वाधिक (१२६ टक्के) लसीकरण झाले. त्या खालोखाल सातारा, धुळे, जालना, बुलढाणा आणि वर्धा या जिल्ह्य़ांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा जास्त लसीकरण झाले.
राज्यात बुधवारी ५३८ केंद्रांवर ४१ हजार ४७० आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. मुंबईत पुन्हा लसीकरणाच्या संख्येत घट नोंदवण्यात आली असून बुधवारी उद्दिष्टाच्या ६८ टक्के लसीकरण झाले. मुंबईत आत्तापर्यंत २३ हजार ३९९ तर राज्यात १ लाख ७८ हजार ३७१ कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
२१९ जणांना ‘कोव्हॅक्सिन’
भारत बायोटेक निर्मित ‘कोव्हॅक्सिन’ लस राज्यातील सहा ठिकाणी देण्यात येत आहे. मात्र, अद्यापही या लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळत आहे. बुधवारी अमरावती जिल्ह्य़ात १०० जणांना, पुणे येथे १७, मुंबई १८, नागपूर ४०, सोलापूर ७ आणि औरंगाबादमध्ये ३७ अशा २१९ जणांना ही लस देण्यात आली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 28, 2021 12:22 am