26 February 2021

News Flash

Coronavirus : मुंबईत ७८ टक्के रुग्ण करोनामुक्त

२४ तासांत १०६६ बाधित, ४८ जणांचा मृत्यू

२४ तासांत १०६६ बाधित, ४८ जणांचा मृत्यू

मुंबई : मुंबईत गेल्या २४ तासांत १०६६ रुग्ण आढळले, तर ४८ जणांचा मृत्यू झाला. एकूण बाधितांचा आकडा एक लाख २० हजारांच्यापुढे गेला असून, करोनामुक्तांची संख्याही ९६ हजारांवर (सुमारे ७८ टक्के) गेली आहे. मृतांची एकूण संख्या ६७९६ झाली असून, मृत्यूदर ५.५ टक्क्य़ांवर पोहोचला आहे. उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे.

मुंबईतील रुग्णवाढीचा सरासरी दर ०.८१ टक्के आहे. बोरिवली आणि मस्जिद बंदर, ग्रँटरोड-मलबार हिल येथील रुग्णवाढीचा दर अधिक आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी तीन महिन्यापर्यंत पोहोचला आहे.

रविवारी १०६६ नवीन रुग्ण आढळले असून, एकूण बाधितांचा आकडा १,२३,३९७ वर गेला आहे. तर एका दिवसात १२३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत ९६,५८६ म्हणजेच ७८ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी झाली असून १९,७१८ रुग्णांवर अद्याप उपचार सुरू आहेत.

शनिवारी नोंद झालेल्या ४८ मृतांपैकी ३६ पुरुष आणि १२ महिला होत्या. ३५ रुग्णांचे वय ६० वर्षांवरील होते.

मुंबईत आतापर्यंत ५ लाख ९९ हजार ७९१ चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी २० टक्के लोक बाधित आढळले आहेत. गेल्या आठवडय़ाभरात दरदिवशी सरासरी ८००० चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी दरदिवशी १२ ते १५ टक्के रुग्ण बाधित आढळले आहेत.

ठाणे जिल्ह्यात १,२०७ नवे रुग्ण

* ठाणे जिल्ह्य़ात रविवारी १ हजार २०७ करोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्य़ातील एकूण रुग्णसंख्या ९८ हजार १६७ इतकी झाली आहे. दिवसभरात २९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या २ हजार ७४७ इतकी झाली आहे.

* रविवारी नवी मुंबईत ३३२, कल्याण-डोंबिवली शहर २९७, ठाणे शहर २०२, मीरा-भाईंदर १६४, अंबरनाथ शहर ६६, बदलापूर शहर ५४, ठाणे ग्रामीण ४६, उल्हासनगर शहरा २३ आणि भिवंडी शहरात २३ रुग्ण आढळून आले.

* जिल्ह्य़ात रविवारी २९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला असून, त्यामध्ये कल्याण-डोंबिवलीतील ९, नवी मुंबईतील ८, ठाणे ग्रामीणमधील ४, ठाण्यातील ३, उल्हासनगरमधील ३, तर मीरा भाईंदर आणि बदलापूर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2020 3:56 am

Web Title: 78 percent of patients in mumbai recovered from coronavirus zws 70
टॅग : Coronavirus
Next Stories
1 जेबीनगरमध्ये बिबटय़ा?
2 धरणांत निम्मा साठा
3 कॅप्टन दीपक साठे यांचे पार्थिव मुंबईत
Just Now!
X