मुंबई परिसरातून आठ जणांना अटक; साडेचारशे बांगलादेशीयांना पारपत्र वाटप

मुंबई : बांगलादेशी नागरिकांना बनावट कागदपत्रांआधारे पारपत्र (पासपोर्ट) मिळवून देणाऱ्या आठ जणांच्या टोळीला राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मुंबई, नवी मुंबई, ठाण्यातून अटक के ली. अटक आरोपींपैकी चौघे बांगलादेशी आहेत. या टोळीने अलीकडच्या काळात ४४६ व्यक्तींना बनावट कागदपत्रांआधारे पारपत्र मिळवून दिले. त्यातील ८५ बांगलादेशींची ओळख पटली असून पारपत्राचा वापर त्यांनी कु ठे, कसा के ला, याचा तपास एटीएसकडून सुरू आहे.

आजवर उदरनिर्वाहासाठी भारतात चोरटय़ा मार्गाने दाखल होणारे बहुतांश बांगलादेशी नागरिक बांधकाम क्षेत्रात मजुरी करत. त्यांना निवाऱ्यासह काम मिळवण्यासाठी शिधापत्रिका, मतदान ओळखपत्र, आधारकार्ड किं वा पॅनकार्डची आवश्यकता भासते. मात्र भारतीय नागरिक म्हणून बांगलादेशी घुसखोरांनी पारपत्र मिळविण्यापर्यंत मारलेली मजल एटीएसच्या दृष्टीने देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची बाब ठरते. एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार खरी ओळख दडवून घातपाती कृ त्य किं वा भारतात राहून बांगलादेशसह अन्य देशांच्या गुप्तहेरांसाठी हेरगिरी करण्यासाठी या पारपत्रांचा वापर होऊ शकतो.

पारपत्रासाठी आवश्यक असलेली पॅनकार्ड, आधार कार्ड, शिधापत्रिका, विजेचे बिल, भाडे करार, शाळा सोडल्याचा दाखला, जन्मदाखला, बँक बुक आदी कागदपत्रे बनावट तयार करून ती विभागीय पारपत्र कार्यालयाला ऑनलाइन सादर करून पारपत्र मिळवून देणाऱ्या या टोळीबाबत एटीएसच्या काळाचौकी कक्षाला माहिती मिळाली. त्याआधारे पथकाने अक्र म शेख, मोहम्मद रफिक, अविन के दारे, महोम्मद सोहेल अब्दुल सुभान शेख, अब्दुलखर समसुलहक शेख, अबुल हाशम ऊर्फ म्हामून अबुल कासम शेख, इद्रीस शेख आणि नितीन निकम या आठजणांना अटक के ली. यापैकी अक्र म, महोम्मद सोहेल, अब्दुलखर आणि अब्दुल हाशम हे बांगलादेशी नागरिक आहेत.

या टोळीने अलीकडच्या काळात तयार करून घेतलेल्या प्रत्येक पारपत्राची, ती तयार करून घेणाऱ्याची झाडाझडती घेतली जाणार आहे. या पारपत्राचा वापर कशासाठी के ला, त्याचीही चौकशी होणार आहे, असे एटीएसकडून सांगण्यात आले.

 

बांगलादेशी चलन, सिमकार्ड हस्तगत

अटक आरोपी अक्र म याच्याकडून २२४२ मूल्याचे बांगलादेशी चलन (टका), सात बांगलादेशी सीमकार्ड, १८ भारतीय सिमकार्ड, बांगलादेशातील आठ व्हिजिटिंग कार्ड, विविध बँकांची आठ डेबिट कार्ड आणि साडेआठ लाख रुपये हस्तगत करण्यात आले. तर आरोपी के दारे याच्याकडून रबरी शिक्के  तयार करण्याचे यंत्र, रायगड जिल्हाधिकारी खाणीकर्म विभाग, असे नमूद के लेले आणि भारताची राजमुद्रा असलेले होलोग्राम स्टीकर, आरोपी इद्रिसकडून बँक, शाळा, सहकारी सोसायटी, विविध सरकारी यंत्रणांचे ३६ रबरी शिक्के , जन्म-मृत्यूसह शाखळा सोडल्याचे कोरे दाखले, बनावट शिधापत्रिका, बनावट बँक पासबुक आढळून आले.