News Flash

पश्चिम घाटात ८ नवी संरक्षित वने

राज्य वन्य जीव मंडळाचा निर्णय

(संग्रहित छायाचित्र

राज्य वन्य जीव मंडळाचा निर्णय

मुंबई : राज्यातील पर्यावरण संवर्धनासाठी वनांची जोपासना करण्याच्या दृष्टीने संवेदनशील अशा पश्चिम घाटातील ८ तर विदर्भातील दोन अशा  १० नव्या संवर्धन राखीव क्षेत्रांना मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य वन्य जीव मंडळाच्या बैठकीत शुक्रवारी घेण्यात आला.

याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्य़ातील कन्हाळगाव हे राज्यातील ५० वे अभयारण्य घोषित करण्यात आले असून त्याचे एकूण क्षेत्र २६९ चौरस किलोमीटर आहे.

आधीचे सहा आणि नवीन घोषित झालेले तिलारी असे मिळून राज्यात सध्या ७ संवर्धन राखीव क्षेत्र आहेत. त्यात आता कोल्हापूर जिल्ह्य़ातील ५, सिंधुदुर्गातील एक, साताऱ्यातील २ तर विदर्भातील २ अशा आणखी १० नवीन संवर्धन राखीव क्षेत्रांची भर पडली आहे.

या बैठकीत आधीच्या संवर्धन क्षेत्रांत महत्त्वाची कामे करण्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी द्यावा या वन विभागाच्या मागणीवर प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. वनमंत्री संजय राठोड, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आदी या बैठकीस उपस्थित होते.

जंगलावर लोकांचे अवलंबित्व कमी करण्यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून लोकांना रोजगार निर्माण करून देण्यासाठी वन विभाग करत असलेल्या प्रयत्नासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. त्यामुळे वन किंवा अभ्यारण्याबद्दल  लोक अधिक सकारात्मक होऊन संवर्धनात सहकार्य करतील, अशी आशा ठाकरे यांनी व्यक्त केली.

राज्यातील या १० नव्या संवर्धन राखीव क्षेत्रांमुळे एकू ण  एक हजार चौरस किलोमीटरच्या क्षेत्रातील पर्यावरणाचे-वनांचे संवर्धन होणार आहे.

–  पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे 

पर्यावरण संवेदनशील क्षेत्र अंतिमत: घोषित  झाल्यानंतर त्याचा  विभागीय बृहद आराखडा जिल्हाधिकाऱ्यांनी तीन महिन्यांत तयार करावा. तो करताना वन, पर्यावरण, महसूल, नगरविकास अशा संबंधित विभागाचे सहकार्य घ्यावे-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नवी भर..    आंबोली दोडा मार्ग संवर्धन राखीव क्षेत्र (सिंधुदुर्ग), चंदगड संवर्धन राखीव क्षेत्र (कोल्हापूर), आजरा-भुदरगड संवर्धन राखीव क्षेत्र (कोल्हापूर), गगनबावडा संवर्धन राखीव क्षेत्र (कोल्हापूर), पन्हाळगड संवर्धन राखीव क्षेत्र (कोल्हापूर), विशाळगड संवर्धन राखीव क्षेत्र (कोल्हापूर), जोर जांभळी संवर्धन राखीव क्षेत्र (सातारा), मायनी संवर्धन राखीव क्षेत्र (सातारा) आणि विदर्भातील महेंद्री, मुनिया आता संरक्षित वनक्षेत्रात गणले जाणार आहेत.

– वाघाप्रमाणे बिबटय़ा आणि मानव संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश.

– अवनी वाघिणीच्या पिल्लय़ाची संपूर्ण वाढ झाली असून या पिल्लय़ाला पेंच येथील नैसर्गिक अधिवासात सोडण्यास मान्यता.

– नवीन ट्रान्झिट् ट्रीटमेंट सेंटर सुरू करण्यासाठी नाशिक पुणे येथून प्रस्ताव प्राप्त, जुन्या ट्रान्झिट सेंटरला निधी देऊन सक्षम करण्याचा निर्णय

– चंद्रपूर जिल्ह्य़ातील वाघ इतरत्र स्थलांतरित करण्यासाठी नियुक्त समितीचा अहवाल लवकरच शासनास सादर होईल.

– चांदा ते बांदापर्यंत जे महाराष्ट्राचे वन वैभव आहे. त्याचे विविध ऋतूतील वैशिष्टय़ टीपण्यास वन रक्षकांना सांगावे, त्याचा दर्जा उत्तम राखावा यावरून राज्यासाठी आपण एक चांगली फिल्म तयार करू.

– महेंद्रीला संवर्धन राखीव घोषित करताना भविष्यात त्याचे अभयारण्यात रूपांतर करण्यापूर्वी लोकांना विश्वासात घेऊन, गावकऱ्यांशी चर्चा करून पुनर्वसनाचा कालबद्ध कार्यक्रम तयार करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2020 3:01 am

Web Title: 8 new protected forests in the western ghats zws 70
Next Stories
1 करोनाच्या सद्य:स्थितीवर  डॉ. राहुल पंडित यांच्याशी चर्चा
2 मुंबई पारबंदर प्रकल्प सप्टेंबर २०२२ मध्ये पूर्ण
3 Coronavirus : मुंबईत रुग्णदुपटीच्या कालावधीत वाढ
Just Now!
X