28 October 2020

News Flash

Coronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर

मुंबईत दिवसभरात २,२६१ बाधित; ४४ जणांचा मृत्यू

मुंबई पालिकेच्या देवनार येथील प्रसूतिगृहात गर्भवती महिलांची करोना चाचणी करण्यात आली.

मुंबईत दिवसभरात २,२६१ बाधित; ४४ जणांचा मृत्यू

मुंबई : मुंबईमधील करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर पोहोचले असून, रुग्ण दुपटीचा काळही सरासरी ६६ दिवस झाला आहे. रविवारी २,२६१ मुंबईकरांना करोनाची बाधा झाली, तर ४४ जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात तब्बल चार हजारांहून अधिक रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

करोनाबाधितांचा शोध घेण्यासाठी पालिकेने चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. त्याचबरोबर बाधितांच्या संपर्कातील संशयित रुग्णांचा शोधही युद्धपातळीवर सुरू केला आहे. मुंबईतील एकूण करोनाबाधितांची संख्या एक लाख ९८ हजार ७२० वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ८,७९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रविवारी मृत्यू झालेल्या ४४ जणांमध्ये ३० पुरुष आणि १४ महिलांचा समावेश होता. यापैकी ३८ जणांना दीर्घकालीन आजार होते.

विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेणारे तब्बल ४,१९० रुग्ण करोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. आतापर्यंत एक लाख ६२ हजार ९३९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. आजघडीला विविध रुग्णालयांमध्ये २६ हजार ५९३ उपचाराधीन रुग्ण आहेत.

झोपडपट्टय़ांच्या तुलनेत इमारतींमध्ये मोठय़ा संख्येने करोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. करोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे आतापर्यंत १० हजार २८९ इमारती टाळेबंद करण्यात आल्या आहेत. तर ६७६ ठिकाणे प्रतिबंधित करण्यात आली आहेत. करोनाबाधितांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत १० लाख ८२ हजार ३२९ चाचण्या करण्यात आल्या आहेत.

ठाणे जिल्ह्य़ात १,६८९ नवे रुग्ण

ठाणे : जिल्ह्य़ात रविवारी १ हजार ६८९ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या आता १ लाख ७० हजार ३३४ इतकी झाली आहे. दिवसभरात ३० जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने जिल्ह्य़ातील एकूण मृतांची संख्या ४ हजार ३६५ वर पोहोचली आहे.रविवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये ठाणे शहरातील ४१८, नवी मुंबईतील ३४७, कल्याण-डोंबिवली शहरातील ३४०, मीरा-भाईंदरमधील १९६, ठाणे ग्रामीणमधील १५४, उल्हासनगर शहरातील ७९, बदलापूर शहरातील ६१, अंबरनाथ शहरातील ५७ आणि भिवंडी शहरातील ३७ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये ठाणे शहरातील ७, कल्याण-डोंबिवलीतील ६, मीरा-भाईंदरमधील ६, नवी मुंबईतील ५, उल्हासनगर शहरातील ४ तर ठाणे ग्रामीणमधील आणि अंबरनाथमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2020 2:55 am

Web Title: 82 percent covid 19 patients in mumbai recovered zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 ‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण
2 ‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत!
3 वर्षअखेरीस मुंबईतील मृतांची संख्या लाखावर जाण्याची भीती
Just Now!
X