राज्यात लागोपाठ पाचव्या दिवशी २४ तासांत आठ हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळले. दिवसभरात ८,२९३ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, ६२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. मुंबईत पुन्हा हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळले. तर पुणे, नागपूर आणि अमरावती शहरांमध्ये रुग्ण आढळण्याचे प्रमाण अधिक आहे.

उपचाराधीन रुग्णांची संख्याही वाढली आहे. सध्या ७७ हजारांपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात पुणे जिल्ह्य़ात सर्वाधिक १५ हजार रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात मुंबईत १०५१, पुणे शहरात ७९०, पिंपरी-चिंचवडमध्ये ३९९, उर्वरित पुणे जिल्ह्य़ात ३९६, औरंगाबाद शहरात २५५, अमरावती शहरामध्ये ६३२, नागपूर शहरात ७९६ नवे रुग्ण आढळले.