09 March 2021

News Flash

सातही जलाशयांत ८७ टक्के पाणीसाठा

तरीही आजपासून १० टक्के पाणीकपात

संग्रहित छायाचित्र

 

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांत मिळून गुरुवारी ८७ टक्के म्हणजे १२ लाख ६२ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. मात्र १३ टक्के तूट असल्याने २० ऐवजी १० टक्के पाणीकपात लागू राहील. हा बदल शुक्रवारपासून लागू होणार आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या क्षेत्रात पाऊस पडत असून त्यामुळे तलावातील पाण्याच्या पातळीत झपाटय़ाने वाढ  होते आहे. उध्र्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सातही तलावांत मिळून गुरुवापर्यंत ८७ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. तुळशी, विहार आणि मोडकसागर हे तीन तलाव आतापर्यंत पूर्ण भरले आहेत. दररोज चार ते पाच टक्के पाणीसाठा वाढत आहे. त्यामुळे सध्या मुंबईत सुरू असलेली २० टक्कय़ांची पाणीकपात १० टक्कय़ांवर करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर पाणीकपात कमी करण्यात आली आहे.

१३ टक्के तूट

मुंबईला दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करावा लागतो. पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी सर्व तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले असणे आवश्यक आहे. सातही तलावांत मिळून १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा होणे आवश्यक असते. अद्याप १३ टक्के म्हणजेच पावणे दोन लाख दशलक्ष लिटरची तूट  आहे. तर गेल्यावर्षीच्या तुलनेत आठ  टक्के तूट आहे. अद्याप पावसाळ्याचा दीड महिना शिल्लक आहे.

तलाव   पाणीसाठा      टक्केवारी

(दशलक्ष लिटर)

उध्र्व वैतरणा १,६३,२९९       ७१.९२

मोडक सागर १,२८,९२५       १००.००

तानसा  १,३७,८१५       ९४.९९

मध्य वैतरणा    १,८१,७४१       ९३.९१

भातसा  ६,१४,५९५       ८५.७१

विहार   २७,६९८     १००

तुळशी  ८,०४६      १००

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2020 12:39 am

Web Title: 87 water storage in all seven reservoirs abn 97
Next Stories
1 ३० वर्षांपूर्वीच्या धोकादायक इमारतींचे पुनर्वसन अडचणीत?
2 ‘उत्सवी’ कलाकार-तंत्रज्ञांची उपासमार
3 ‘क्यूआर कोड’ ओळखपत्र २०० रुपयांत!
Just Now!
X