मुंबईत ८८४ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतल्या रुग्णांची संख्या आता १८ हजार ३९६ इतकी झाली आहे. आज २३८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर मुंबईत करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता ६९६ झाली आहे. मुंबई महापालिकेने यासंदर्भातली माहिती दिली आहे.

मुंबईत ४१ मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी १४ मृत्यू हे ७ ते १२ मे या कालावधीतले आहेत. २४ रुग्णांना मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब असे गंभीर आजार होते. ४१ पैकी २७ मृत्यू हे ६० वर्षे आणि त्यावरच्या वयातल्या रुग्णांचे होते. तर १२ मृत्यू हे ४० ते ६० या वयोगटातल्या रुग्णांचे होते अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.