चित्रपटगृहे आणि संबंधित उद्योगांचे ९००० कोटींचे नुकसान झाल्याचा दावा

मुंबई :  टाळेबंदीमुळे चित्रपटगृहांशी संबंधित उद्योग आणि चित्रपटगृह व्यावसायिकांचे ९००० कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान आहे, याकडे सरकारचे लक्ष वेधून घेत चित्रपटगृहे सुरू करण्याच्या मागणीसाठी मनोरंजनविश्व एकवटले आहे.

चित्रपटगृह व्यावसायिकांनी गेले काही महिने सातत्याने चित्रपटगृहे सुरू करण्याच्या मागणीसाठी के ंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. आता निर्माता संघटनांनीही यासाठी पुढाकार घेतला असून जोवर चित्रपटगृहे सुरू होत नाहीत तोवर चित्रपट व्यवसायाला स्थैर्य येणे कठीण असल्याचे सांगितले जात आहे. टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर चित्रपटगृहांवर पहिल्यांदा बंदी आणली गेली, मात्र टप्प्याटप्प्याने सुरू असलेल्या शिथिलीकरणाच्या प्रक्रियेत चित्रपटगृहांचा सगळ्यात शेवटी विचार के ला जात असल्याबद्दल चित्रपटगृह व्यावसायिकांच्या संघटनांनी खंत व्यक्त के ली आहे. गेल्या सहा महिन्यात व्यवसाय ठप्प असल्याने मालमत्ता कर, वीजदेयके, भाडे आदी खर्चाचा बोजा वाढतच चालला आहे. या महिन्याभरात चित्रपटगृहे सुरू न झाल्यास देशातील १५ ते २० टक्के चित्रपटगृहे कायमस्वरूपी बंद होतील, अशी भीती चित्रपटगृह व्यावसायिकांनी व्यक्त के ली आहे. दर महिन्याला १५०० कोटी रुपये उत्पन्न असलेल्या या व्यवसायावर वीस लाख  कर्मचाऱ्यांचा रोजगार अवलंबून आहे, याकडे लक्ष वेधत ‘मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया’, ‘सिनेमा ओनर्स अ‍ॅण्ड एक्झिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडिया’, ‘इम्पा’ आणि ‘प्रोडय़ुसर्स गिल्ड ऑफ इंडिया’ या संघटनांनी चित्रपटगृहे तातडीने सुरू करण्याची मागणी के ंद्र सरकारकडे के ली आहे. चित्रपटगृहे बंद असल्याने काही निर्मात्यांनी ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित के ल्याने चित्रपटगृह व्यावसायिक व निर्माते यांच्यात वादही निर्माण झाला होता. मात्र यावर्षी रखडलेल्या काही मोठय़ा बजेटचे चित्रपट प्रदर्शनासाठी दिवाळी आणि नाताळ या सणांच्या मुहूर्तावर अवलंबून आहेत. शिवाय जोवर चित्रपटगृहे सुरू होत नाहीत तोवर नवीन चित्रपटांचे चित्रीकरण पूर्ण करूनही फायदा नाही. त्यामुळे चित्रपटगृहे सुरू होणे अत्यंत गरजेचे असून त्यासाठी निर्मात्यांच्या संघटनांनीही एकत्र येत पाठपुरावा सुरू के ला असल्याची माहिती ट्रेड विश्लेषक अतुल मोहन यांनी दिली. तर चित्रपटगृहे लवकर सुरू झाल्यास रखडलेल्या अनेक चित्रपट दाखवता येतील, असे मत सिनेअभ्यासक तरण आदर्श यांनी व्यक्त के ले.

निर्मात्यांचाही पाठिंबा

मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून चित्रपटगृहे सुरू करणे शक्य आहे. ८५ देशांमध्ये चित्रपटगृहे सुरू  करण्यात आली आहेत, याकडेही या संघटनांनी लक्ष वेधले आहे. संघटनांनी के लेल्या या मागणीला पहिल्यांदाच जाहीर पाठिंबा दर्शवत निर्माता करण जोहर, यशराज प्रॉडक्शन, दिग्दर्शक अनुराग कश्यप आदी बॉलीवूडजनही यासाठी एकत्र आले आहेत.