05 July 2020

News Flash

फेरीवाल्यांकडील ९२ टक्के बर्फ दूषित

उन्हाळ्यातील तहान भागवण्यासाठी बर्फाच्या थंडगार पेयाकडे अनेकांची पावले वळतात.

पालिकेच्या आरोग्य खात्याची माहिती; पाण्याच्या २६ टक्के नमुन्यांमध्येही ई कोलायचे जीवाणू
उन्हाळ्यातील तहान भागवण्यासाठी बर्फाच्या थंडगार पेयाकडे अनेकांची पावले वळतात. मात्र खाद्य व पेयपदार्थ विक्रेत्यांकडील बर्फाच्या ९२ टक्के नमुन्यांमध्ये ई कोलाय जिवाणू आढळले आहे. पालिकेच्या आरोग्य खात्याने केलेल्या या तपासणीत फेरीवाल्यांकडील पाण्याच्या २६ टक्के नमुन्यांमध्येही ई कोलाय सापडला आहे.
शहराच्या दमट हवामानात घामाच्या धारा वाहत असताना रस्त्यावरील बर्फाचे गोळे व थंड पेय पिणाऱ्यांची संख्या वाढते. मात्र दूषित पाण्यामुळे याच काळात अनेक संसर्गजन्य आजारही पसरतात. या आजारांना पायबंद घालण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी १ ते ३१ मे दरम्यान आरोग्य विभागाकडून मोहीम राबवली गेली. शहरभर पसरलेले बर्फ विक्रेते, उपाहारगृह, ज्यूस सेंटर, उसाचा रस विक्रेते, डेअरी, मिठाईची दुकाने, बर्फाचे गोळे विक्रेते, लस्सी व ताक विक्रेते, फास्ट फूड सेंटर अशा सर्व विक्रेत्यांकडील बर्फाचे ९४८ नमुने गोळा करण्यात आले. त्यातील ९२ टक्के म्हणजे ८७० नमुन्यांमध्ये ई कोलाय जिवाणू आढळले. खाद्यविक्रेत्यांकडून गोळा करण्यात आलेल्या पाण्याच्या ४७६ नमुन्यांपैकी १२६ नमुन्यात ई कोलाय सापडले.
महत्त्वाचे म्हणजे बी, सी, डी, एफ उत्तर, जी उत्तर, के पूर्व, आर दक्षिण, एन आणि टी या विभागातील सर्व म्हणजे १०० टक्के नमुने दूषित होते. दूषित पाणी व बर्फ आढळलेल्या विक्रेत्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे. मोहिमेदरम्यान ५५२ दुकाने आणि २९९५ फेरीवाल्यांकडील अन्नपदार्थाची पाहणी करण्यात आली व दूषित नमुने तात्काळ नष्ट करण्यात आले. या अंतर्गत १ हजार १२९ किलो मिठाई, ४ हजार ५६५ किलो खाद्यपदार्थ, ४ हजार ८१८ लिटर पेयपदार्थ यासह सुमारे ३ हजार ९०० किलो फळे व भाज्या नष्ट केल्या गेल्या.
ई कोलायने काय होते? मानवी विष्ठेमध्ये हा जिवाणू मोठय़ा प्रमाणात आढळतो. यामुळे अतिसार, जुलाब यांसारखे आजार होऊ
शकतात.

बर्फ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी, साचा, बर्फ ठेवण्याची ठिकाणे, बर्फ हाताळणारे हात तसेच तो फोडून देतानाही ई कोलायचे जंतू बर्फात जाण्याची शक्यता असते. थंड तापमानामुळेही इ कोलायचा प्रादुर्भाव वाढू शकत असल्याने पाण्यापेक्षा बर्फात अधिक प्रमाणात ई कोलाय आढळले. मुख्य म्हणजे फेरीवाल्यांपासून स्वच्छ वाटणाऱ्या दुकानांमध्येही बर्फ दूषित होता.
– डॉ. पद्मजा केसकर, कार्यकारी आरोग्य अधिकारी, महानगरपालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2016 2:36 am

Web Title: 92 percent contaminated snow use hawkers
Next Stories
1 कुलाब्यातील ‘मेट्रो हाऊस’ला आग
2 रेल्वेच्या ‘हमसफर’ सप्ताहातच प्रवासी सर्वाधिक हतबल!
3 झोपडय़ांच्या इमल्यांपुढे पूल थिटा
Just Now!
X